गावगाथा
शिक्षकांनी नवराष्ट्र निर्मिती साठी योगदान द्यावे : मुकुंद पत्की
कल्याणशेट्टी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम

शिक्षकांनी नवराष्ट्र निर्मिती साठी योगदान द्यावे : मुकुंद पत्की
कल्याणशेट्टी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम
अक्कलकोट:
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात समाजाची अवस्था दोलायमान झाली आहे. विद्यार्थी मोबाईल, व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक यामध्ये व्यस्त आहे. त्याचे वाचन करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्याच्या अंगी असलेली सर्जनशील, जिज्ञासू वृत्ती, प्रयोगशीलता पुरती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, देशी उद्योग व्यवसायाची अवस्था विचित्र झाली आहे, अशा परिस्थितीत शिक्षकांनी नवराष्ट्र निर्मितीसाठी योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन साहित्यिक मुकुंद पत्की यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, प्रा भीम सोनकांबळे, प्रा राजशेखर पवार उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, विद्यार्थी व नागरिकांना परिवर्तनाची दिशा दाखविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांनी स्वीकारावी पाहिजे, त्यातूनच नव भारताची निर्मिती होणार आहे.
मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, विद्यार्थ्यांना तसेच समाजाला परिवर्तनाचे मार्ग शिक्षकांमुळेच दिसतात त्यामुळेच सामाजिक अभिसरण देखील जलदगतीने होते म्हणून शिक्षकांची भूमिका दिशादर्शक असावी.
प्रारंभी महाविद्यालयातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर तमन्ना शेरीकर, शिवानंद जमादार, सिद्धाराम स्वामी, प्रा सौरभ भस्मे, प्रा मनीषा शिंदे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन पवन अंबुरे, सानिया शेख यांनी केले. आभार महादेवी नडगेरी यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
HTML img Tag

प्रा सौरभ भस्मे यांचा सत्कार