गावगाथा

जगप्रसिद्ध नाडीतज्ञ डॉ.के.वासु यांच्या पुण्यातील नित्यानंद धाम आश्रमास महेश इंगळे यांची सदिच्छा भेट.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या खंडीत झालेल्या आरोग्य शिबीर सेवेसाठी डॉ.वासु यांना दिले निमंत्रण.

जगप्रसिद्ध नाडीतज्ञ डॉ.के.वासु यांच्या पुण्यातील नित्यानंद धाम आश्रमास महेश इंगळे यांची सदिच्छा भेट.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या खंडीत झालेल्या आरोग्य शिबीर सेवेसाठी डॉ.वासु यांना दिले निमंत्रण.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.०४/०९/२०२५)
जगप्रसिद्ध नाडीतज्ञ डॉ.के.वासु यांच्या पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट येथील नित्यानंद धाम आश्रमास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी नुकतेच सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थान संचलीत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात डॉ. वासु यांच्या वतीने घेण्यात येणारी आरोग्य शिबीरे सेवा कोरोना कालावधीमुळे खंडीत झाली होती. तालुक्यातील रुग्णांच्या मागणीस अनुसरून ही सेवा डॉ.वासु यांच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात यावी या करिता मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांनी डॉ. वासु यांच्या पुण्यातील निवासीय आश्रमास भेट देवून डॉ.वासु यांना निमंत्रण दिले. या प्रसंगी डॉ.वासु यांनी महेश इंगळे यांची विनंतीस मान देत देवस्थानच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात येत्या ऑक्टोबर महिन्यापासून आरोग्य शिबीर सेवा व औषधोपचार सेवेचे उपक्रम रुग्ण सेवा हीच स्वामी सेवा या ओवीचं महत्व लक्षात घेऊन सातत्याने राबविण्याचे शब्द दिले. या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी रुग्णसेवा हीच स्वामी सेवा या उक्तीस अनुसरून देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्यां माध्यमातून आज पर्यंत विविध प्रकारची अनेक शिबीरे राबवून श्री स्वामींची सेवा सार्थ ठरविली आहे. ही सेवा अखंडीत पणे भविष्यातही सुरू रहावी या करीता आज डॉ.वासु यांच्या आश्रमास भेट दिली आहे. डॉ.वासु हे भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दक्षिण अफ्रीका, सिंगापूर, श्रीलंका, युनायटेड किंग्डम, रशिया, संयुक्त अरब अमिरात आदींसह जगभरात
डॉ.वासु हे आपली वैद्यकीय सेवा देतात. त्यांची सेवा गौरवास्पद असून आजवर त्यांना भारत सरकारच्या वतीने विवीध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. या निमीत्ताने डॉ.वासु यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद कायम रहावे यासाठी मंदीर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी डॉ.के.वासु व डॉ.सपना वासु यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केल्यानंतर खडकी कॅन्टोन्मेंट येथील नित्यानंद धाम आश्रमची पाहणी करुन डॉ.के.वासु यांच्या वैद्यकीय सेवेच्या गौरव प्रित्यर्थ महेश इंगळे बोलत होते. यावेळी प्रथमेश इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, तन्मय भोसले, स्वामीनाथ मुसळे, धनराज स्वामी व डॉ.वासु यांचे कुटूंबिय उपस्थित होते.
फोटो ओळ – डॉ.के.वासु व डॉ.सपना वासु यांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button