दमदार पर्जन्यवृष्टी दरवर्षी सातत्याने होणे काळाची गरज – वन अधिकारी पंकज गर्ग
झाडी व वनक्षेत्र संवर्धनसाठी पंकज गर्ग यांचे स्वामींचरणी साकडे
(श्रीशैल गवंडी, दि.९/९/२०२५.अ.कोट)
यंदा देशभरासह राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. ही पर्जन्यवृष्टीची समतोलता व सातत्य देशभरात समान राखण्याकरीता दमदार
पर्जन्यवृष्टी दरवर्षी सातत्याने होणे काळाची गरज असल्याचे मनोगत पुणे सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य वन अधिकारी पंकज गर्ग यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सहकुटूंब भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी वन अधिकारी पंकज गर्ग व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला यावेळी बोलताना वन अधिकारी पंकज गर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना
वन अधिकारी पंकज गर्ग यांनी दमदार पर्जन्यवृष्टी सगळीकडे दरवर्षी सातत्याने होणेसाठी व झाडी व वनक्षेत्र संवर्धनसाठी स्वामींचरणी साकडे घातले असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी अक्कलकोट वनखात्यातील रेणुका सोनटक्के, दयानंद जाधव, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – वटवृक्ष मंदीरात पंकज गर्ग यांचा सहकुटूंब सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!