गावगाथा

श्री परमेश्वर आराधना (पर्व) पालखी महोत्सव १८ व १९ सप्टेंबर २०२५ रोजी वैभवशाली पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होणार…

सलग दोन दिवस अन्यदान महाप्रसादाचे वाटप होणार

श्री परमेश्वर आराधना (पर्व) पालखी महोत्सव १८ व १९ सप्टेंबर २०२५ रोजी वैभवशाली पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होणार…

वागदरी — अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सिमेलगत असलेल्या प्रसिद्ध परमेश्वर पर्व यंदा १८ सप्टेंबर २०२५ गुरुवारी व १९ सप्टेंबर २०२५ शुक्रवारी संपन्न होणार आहे सालाबादाप्रमाणे या वर्षी हि श्रीमनृप शालीवाहन शके १९४७ विश्वावसूनाम संवत्सर दक्षीणायन सौर शरद ऋतु भाद्रपद मास कृष्णपक्ष तिथी ११ ता.१७/०९/२०२५ वार बुधवार सायंकाळी ४.४३ ते ६.२१ कंटली पूजा कार्यक्रम सपंन्न होईल .मिती भाद्रपद कृ. १२ शके १९४७ वार गुरुवार दि. १८/०९/२०२५ रोजी श्री. म.नि.प्र. शिवलिंगेश्वर महास्वामीजी, विरक्त मठ वागदरी यांच्या अमृत हस्ते पाहटे ४.३९ ते ६.१७ श्रींची महारुद्राभिषेक श्री.ष.ब्र. जय गुरुशांतलिंगाराध्य शिवाचार्य श्री. श्री. शांतलिंगेश्वर हिरेमठ, हिरेजेवर्गी, ता. अफजलपूर यांच्या दिव्य सानिध्यात सकाळी ११ ते १ पर्यंत अंबील घागरीची मिरवणूक, महाप्रसाद, दर्शन व आशिर्वचन दुपारी १ ते सायं. ६ पर्यंत भक्तीगीतांचा संगीत कार्यक्रम रात्री ९ वाजता परगांवच्या विविध संघांचे आगमन, भव्य भारुढ कार्यक्रम तसेच रात्री ९ वाजता श्री भागोडसिध्द गायन संघ अफजलपूर जि. कलबुर्गी-मुख्य गायक : पुंडलिक पुजारी व अमोगसिध्द गायन संघ हाडलगीरी जि. विजयपूर -मुख्य गायक : शांताबाई हाडलगीरी तसेच ११ वा. गोंधळी नाटक संपन्न होईल.
मिती भाद्रपद कृ. १३ शके १९४७ वार शुक्रवार दि. १९/०९/२०२५ रोजी म.नि.प्र. पुज्य श्री. कोरणेश्वर महास्वामीजी, धुत्तरगांव, तॉटधार्य अनुभव मंटप, आळंद यांच्या शुभहस्ते दुपारी १२.३९ ते २.४५ वाजता श्रींची पालखी पुजा तद्नंतर श्री परमेश्वर मंदिरापासून श्रींची भव्य पालखी मिरवणूक गांवातील व परगावाहून आलेल्या सर्व लेझीम, टिपरी, डफली, ढोल, झांज पथक, मलिखांब, भजन मंडळ, नंदीध्वज, नगरवाद्य, बहुरुपी व भांरुडांसोबत पालखी मिरवणूक शुक्रवार दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८. वाजता पालखीस सुहासिनी महाआरती संपन्न होणार आहे
असा आहे पर्व..!
दोन दिवस चालणाऱ्या या सोहळयास पर्व नावाने ओळखले जाते .श्रावण मास संपल्यानंतर उत्तरा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात येणाऱ्या गुरुवारी व शुक्रवारी पर्व साजरा केला जातो या परिसरातील शेतकरी बांधव पर्वनंतरच रब्बी पेरणी हंगामास सुरवात करतात .या परमेश्वर पर्वात प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने असतो..
या महोत्सवा दरम्यान दोन दिवस अंखड अन्नदान म्हणजे महाप्रसाद हुग्गी वाटप होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पंचकमिटी च्या वतीने केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button