जागतिक लिंगायत महासभेच्या सोलापूर जिल्हा युवा अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे यांची निवड
सोलापूर – हत्तुरे वस्ती येथील मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सभागृहात जागतिक लिंगायत महासभेच्या बैठकीत सोलापूर जिल्हा युवा अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव यांच्या हस्ते देण्यात आले. बसवराज दिंडोरे हे सोलापूर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या बैठकीत शिवानंद मगे यांना जिल्हा सचिवपदी, श्री शिवपुत्र कुमठे यांना जिल्हा युवा कार्याध्यक्षपदी, श्री इराण्णा भरडे यांना जिल्हा युवा उपाध्यक्षपदी व श्री जगदीश कुलकर्णी यांना जिल्हा युवा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आले व त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिले.
यावेळी जिल्हा सोलापूर शहर अध्यक्ष राजेंद्र खसगी, राजेंद्र हौदे, महिला अध्यक्षा राजश्री थळंगे,मीनाक्षीताई बागलकोटे,राजशेखर तंबाके,जुळे सोलापूर अध्यक्ष चनबसप्पा गुरुभेटी,विजयकुमार भावे आदी मान्यवर उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!