
“नैसर्गिक आपत्तीच्या काळात अन्नछत्र मंडळाचे सामाजिक बांधिलकीचे दर्शन”
पूरग्रस्तांना अन्नछत्र मंडळाचा दिलासा; अग्निशामक वाहनामुळे जीवितहानी टळली
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ नेहमीप्रमाणे याही वेळेस नैसर्गिक आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांना धावून मदत केली. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सांगवी (खु), सांगवी (बु) व शिरसी येथील बाधित कुटुंबियांना तसेच महसूल, पोलीस कर्मचारी व अडकलेल्या वाहनचालकांना फूड पाकीट वाटप करण्यात आले. गुरुवारी रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले, गावांचा संपर्क तुटला. या परिस्थितीत अन्नछत्र मंडळाच्या वाहनातून त्वरित फूड पाकिटे तयार करून सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते डोअर टू डोअर वाटप करण्यात आले.

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, अंकुश घाडगे, प्रवीण घाडगे, सिद्धाराम कल्याणी, अतिश पवार, महादेव अनगले, रोहन शिर्के, प्रदीप सलबत्ते, रोहित गाडगे, राम माने, बलभीम पवार, फरहान पटेल, गावकामगार तलाठी लक्ष्मण शिंदे, महसूल सेवक जाकीर कागदे, बबन पवार, अप्पा बंडगर, कल्याणी डीग्गे, गुणवंत लवटे, हणमंत घोडके, अशोक गुरव, रुकुम इट्गी, अक्षय घाडगे, ओंकार घाडगे, लक्ष्मण गायकवाड, शरद घाडगे, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी, तुकाराम माने, कुमार सलबत्ते, चंद्रकांत हिबारे, श्रीशैल माळी, शहाजी यादव, खंडेराव होटकर, शिव काळे, रोहित कदम, ज्ञानेश्वर भोसले, शरद भोसले, नाम भोसले आदींसह न्यासाचे पदाधिकारी, सेवेकरी व अमोलराजे भोसले मित्र परिवार उपस्थित होता.

सदैव तत्पर
“श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ नेहमीच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीला धावून येते. आजही त्वरित फूड पाकीट वाटप करून आम्हा ग्रामस्थांना दिलासा दिला.”
— पंचप्पा लवटे, ग्रामस्थ सांगवी (खु)

अन्नछत्र मंडळाच्या अग्निशामक वाहनामुळे जीवितहानी टळली
गुरुवारी मध्यरात्री अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावर कर्जाळ येथे कर्नाटकाहून सोलापूरकडे जाणाऱ्या इनोव्हा कारला अचानक आग लागली. आगीचा भडका उडताच अन्नछत्र मंडळाचा सेवेकरी विश्वनाथ मोटगी यांनी माहिती मिळवताच सेवेकरी विजय उर्फ गोटू माने यांना कळवले. त्यांनी तात्काळ अग्निशामक वाहन चालक सुरज कदम यांच्याशी संपर्क साधून वाहन घटनास्थळी पोहचवले. त्वरित कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात आली आणि जीवितहानी टळली.

