*कल्याणशेट्टी संकुलात हिंदी सप्ताह साजरा*
अक्कलकोट : सौ. सुरेखा कल्याणशेट्टी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समारोप सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका सौ.शांभवी कल्याणशेट्टी, सेमी विभागाच्या सीईओ सौ. रूपाली शहा व ज्युनिअर महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख पूनम कोकळगी हे होते.
तीन गटात स्पर्धा घेण्यात आले होते, त्यात इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी समानार्थी लेखन, शुभेच्छा कार्ड बनवणे, नकला करणे इत्यादी तर आठवी ते दहावीसाठी काव्यवाचन, कथाकथन, सुंदर हस्ताक्षर, कहाणीलेखन वृत्तनिवेदन इत्यादी तसेच महाविद्यालयीन गटासाठी निबंध लेखन, भित्तिपत्रिका, जाहिरात सादरीकरण इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, पर्यवेक्षक सूर्यकांत रुगे, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप, समन्वयक मनीषा दूधभाते तसेच संकुलातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सप्ताहाचे नियोजन मनीषा दूधभाते,आरती थोरात,शुक्ला तिवारी इत्यादी शिक्षकांनी कष्टपूर्वक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी श्रद्धा मोरे ,अदिती बानेगाव यांनी केले तर आभार आरती थोरात यांनी मानले.
∆ *चौकट:*
प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी..
*समानार्थी शब्द लेखन* – १.भक्ती मोराडे 2. कोमल कोरे
*नकला(संवाद)* 1.ईश्वरी सोमेश्वर
* 2. कावेरी गवंडी
*काव्यवाचन* 1.नम्रता माशले
* 2.तन्मय वागदरे
*कहाणीलेखन* 1.अपेक्षा शिंदे
* 2. सुलक्ष्मी टाके
*निबंध लेखन* 1.वैशाली गवळी
* 2.साजिया शेख
Back to top button
×
No WhatsApp Number Found!