अनंत चैतन्य प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.ज्ञानदेव शिंदे “आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित ——–
—————————————-
मित्तभाषी, शिस्तप्रिय,प्रामाणिक व निष्ठापूर्वक कर्तव्य बजावणारे हन्नूर येथील अनंत चैतन्य प्रशालेचे इंग्रजी विषय शिक्षक व पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे यांना यंदाचा सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ” शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ” असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ता. मोहोळ येथील स्वातंत्र्यसेनानी संदीपानदादा गायकवाड सभागृहात पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाषराव माने, पुणे विभागाचे शिक्षक आमदार मा. जयंत आसगावकर,पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत सर, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक मा. गणपतराव मोरे यांच्या हस्ते श्री. शिंदे यांना सपत्नीक गौरवण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. तानाजी माने, सचिव बापू निळ, विद्या सचिव श्रीशैल पाटील, महेश सरवदे, संघाचे सर्व पदाधिकारी,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे, जेष्ठ शिक्षक सरदार मत्तेखाने, अप्पासाहेब काळे, धनंजय जोजन व समस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रशालेचे पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे यांचे संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा.श्री.सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मा. श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ मा. श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका मा. सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते मा. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक मा. मल्लिकार्जुन मसुती, सी. ई.ओ.सौ.रुपाली शहा मॅडम, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी मॅडम यांनी अभिनंदन केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!