‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हा स्वामींचा मुलमंत्र पाठीशी घेऊन जीवनाची वाटचाल – निवेदिता जोशी-सराफ
स्वामी दर्शनानंतर प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्या भावना.
(दि.१७/०९/२०२५, श्रीशैल गवंडी, अ.कोट)
श्री स्वामी समर्थांची अगाध लिला सर्व विश्वव्यापी आहे. यामुळे त्यांना ब्रम्हांडनायक म्हणून संबोधले जाते. श्री स्वामींच्या भक्तीने मनातील सर्व शंका भिती दूर होवून जीवनात नवचैतन्य निर्माण होते, म्हणून जीवनात सदाचार शिष्टाचार बाळगून सत्कार्य करण्याकामी ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हा स्वामींचा मुलमंत्र पाठीशी घेऊन जीवनाची वाटचाल मार्गस्थ असल्याचे मनोगत प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांनी व्यक्त केले. ते आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी निवेदिता जोशी-सराफ बोलत होत्या. पुढे बोलताना निवेदिता जोशी-सराफ यांनी वटवृक्ष मंदिरातील व्यवस्थापन व पावित्र्य उत्तम आहे. महेश इंगळे हे कर्तव्यदक्ष समिती प्रमुख आहेत. ते व त्यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे समर्पित भावनेने व प्रसन्न भावमुद्रेने कार्य करत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे प्रतिपादनही याप्रसंगी निवेदिता जोशी-सराफ यांनी केले. यावेळी प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, मंदार महाराज पुजारी, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी,
गिरीश पवार, श्रीकांत मलवे, प्रविण देशमुख, दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी, रमेश होमकर, प्रदीप जाधव, श्रीकांत राठोड आदींसह भाविक भक्त इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – सिनेअभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व इतर दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!