श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील सत्कार जीवनातील मोठा गौरव – प्रमोद द्विवेदी
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१८/०९/२५) – सर्वसामान्य स्वामी भक्तांप्रमाणे मीही स्वामी भक्त आहे. याच स्वामी भक्तीच्या
माध्यमातून अक्कलकोटला आल्यानंतर समर्थांनी स्वामी दर्शनाची संधी वेळोवेळी
देत रहावी. या माध्यमातून स्वामी कृपेचे वरदहस्त माझ्या व माझ्या कुटुंबीयांवर कायम रहावी याकरिता आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे.दर्शनानंतर लाभलेलं येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील विश्वस्त समितीच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते झालेला सत्कार म्हणजे जीवनातील मोठा गौरव असल्याचे मनोगत
बॅंक ऑफ इंडीया पुणे विभागाचे मुख्य महाप्रबंधक प्रमोद द्विवेदी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी
महाप्रबंधक प्रमोद द्विवेदी व बॅंक ऑफ इंडीया सोलापूर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रबंधक चंद्रशेखर मंत्री यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना प्रमोद द्विवेदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्य महाप्रबंधक प्रमोद द्विवेदी यांच्या समवेत उपस्थित असलेले बँक ऑफ इंडीयाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक राम वाखर्डे, वरिष्ठ प्रबंधक शरणप्पा पुजारी, सोलापूरचे आर्थिक समायोजन प्रबंधक चेतना जरग, अक्कलकोट शाखेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक महेश घुरे, जेऊर शाखेचे वरिष्ठ प्रबंधक सी.पी.व्यंकटरमण्णा, नागणसूर शाखेचे प्रबंधक संतोष हत्तरगी, शिरवळ शाखेचे प्रबंधक लिंबाजी लाखे, अक्कलकोट शाखेचे प्रशासकीय प्रबंधक अविनाश माने, अक्कलकोट शाखेचे अधिकारी आशिष बेरळीकर, ऋण अधिकारी संपत मगर यांचाही महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी
श्री स्वामी समर्थांचे कृपावस्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी अक्कलकोटचे सनदी लेखापाल ओंकारेश्वर उटगे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, गिरीश पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, महेश मस्कले, दर्शन घाटगे इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – महाप्रबंधक प्रमोद द्विवेदी व सोलापूर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रबंधक चंद्रशेखर मंत्री यासह उपस्थित मान्यवरांचा
देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!