गावगाथा

*सांगवी बु च्या पट्ट्याची दमदार कामगिरी : माढा तालुक्यात अक्कलकोट तहसील च्या आपदा पथकाच्या मध्यमातून बचाव कार्य सुरु*

*आतापर्यंत 40 लोकांना वाचविण्यात यश*

*सांगवी बु च्या पट्ट्याची दमदार कामगिरी : माढा तालुक्यात अक्कलकोट तहसील च्या आपदा पथकाच्या मध्यमातून बचाव कार्य सुरु*
*आतापर्यंत 40 लोकांना वाचविण्यात यश*
अक्कलकोट दि. 23
सध्या महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने माढा तालुक्यात धुमाकूळ घातला असून, कित्येक गावचा संपर्क तुटला तर कित्येक शेतीचे नुकसान झाले असून, या पावसात सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सध्या देखील चालू असल्याने धरणातून 65,500 इतक्या क्यूसेक्स चा विसर्ग करण्यात आला आहे. सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी व नागरिक पुरात अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रसासनाला कळताच त्यांनी तात्काळ अक्कलकोट तहसील कार्यालयाचे आपदा पथकास पाचरण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार माढा तालुक्यातील रिधोरे गावातील 36 लोकं पुरात अडकल्याची माहिती मिळताचा त्यातील या पथकाने 28 पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, 8 जणांना सुरक्षित स्थळी स्थलातरीत केले असून, उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत
या आपदा पथक अक्कलकोट चे तहसीलदार विनायक मगर साहेब यांच्या मार्गदर्शनखली आपदा मित्र प्रविणकुमार बाबर, जाकीर कागदे, गोपीनाथ माने, रामचंद्र माने, हनुमंत सानप, यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button