
हॉटेल अजिंक्यतारा तर्फे पूरग्रस्तांना धान्य कीट व जनावरांना चारा वाटप
अक्कलकोट (प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील प्रसिद्ध हॉटेल अजिंक्यतारा यांच्या वतीने सोलापूरातील पूरबाधितांना ५०० धान्य कीट व जनावरांना चारा वाटप करण्यात आले.
सोलापूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल अजिंक्यतारा यांच्यावतीने पूरग्रस्तांना दिलेल्या या मदतीच्या कार्यामुळे सोलापूरकरातून स्वागत व समाधान व्यक्त होत आहे. सदरचे कीट वाटप हॉटेलचे संचालक अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली संपन्न झाले.
या उपक्रमात संचालक सिद्धेश्वर मोरे, व्यवस्थापक दशरथ संकपाळ, अंकुश हारकुड, सचिन परिट, अंबादास कदम, बिरप्पा वागदरी, तौफिक एरंडे, शिवम ढेपे, काशिनाथ लोंढे, लक्ष्मण राठोड आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.