ओ सी स्पेशालिटीज प्रा. लि. तर्फे मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना दिलासा
सोलापूर (प्रतिनिधी) :
सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचे पीक, घरातील धान्य, जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कठीण परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने सर्व समाजघटकांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ओसी स्पेशालिटीज प्रा. लिमिटेड या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
मोहोळ तालुक्यातील बिरवाडे, अर्जुनसोंड, लाबोटी, कोळेगाव, मुंढेवाडी, भोयरे, शिरापूर आणि हत्तूर या गावांमध्ये कंपनीच्या वतीने मदत साहित्य वाटप करण्यात आले. धान्य, अन्नधान्य कीट, पिण्याचे पाणी, तसेच तातडीच्या गरजेच्या वस्तू यांचे वाटप करून पूरग्रस्तांना दिलासा देण्यात आला.
या वेळी कंपनीचे एच.आर. मॅनेजर श्री. आनंद कनका, कौसर सय्यद तसेच सरकारी अधिकारी उपस्थित होते. गावकऱ्यांनी ओसी स्पेशालिटीज प्रा. लि. च्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. मदत मिळाल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि दिलासा उमटला.
कंपनीकडून देण्यात आलेली ही मदत ही फक्त भौतिक नसून संकटसमयी आधार देणारी भावनिक उर्जा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!