एम के फाऊंडेशन आयोजित त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त नीलमनगर येथे नेत्रदीपक भव्य“दीपोत्सव” साजरा ——-
दीपोत्सव च्या उपक्रमाला भाविकांचा बहुमोल प्रतिसाद लाभल्या बद्दल उपक्रमाचे आयोजक महादेव कोगनुरे यांनी सर्वाचे आभार मानले.

एम के फाऊंडेशन आयोजित
त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त नीलमनगर येथे नेत्रदीपक भव्य“दीपोत्सव” साजरा
——-

हंजगी,

नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी, बँड पथकाचे सुरेल वादन,विद्युतरोषणाईचा झगमगाट आणि दिव्यांच्या लख्ख प्रकाशात नीलम नगर भाग १ येथील गणेश मंदिराच्या प्रांगणात उजळली भव्य दिपोत्सव. निमित्त होते कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेचे गणेश मंदिरांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे एम के फाऊंडेशन च्या वतीने आयोजन केले होते आणि भाविकांनी एकत्र येत सकारात्मकतेचे दिवे प्रज्वलित केले.

विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या काढून नयनरम्य सजावट करण्यात आली होती. जागृत मंडपात ” एक दिवा मांगल्याचा” सारे मिळूनी आज पुन्हा उजळू मांगल्याचा दिवा..!!” या
संकल्पनेतून काढण्यात आलेल्या भव्य रांगोळीच्या आवती भोवती तब्बल अकरा हजारआकर्षक दिव्यांची आरास करून परिसर प्रकाशमान करून नयनरम्य, भव्य दिव्य व अतिशय सुंदर असा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

हजारो दिव्यांच्या तेजोमय प्रकाश सर्वांच्या आयुष्यात सुख घेऊन येईल असे आशिर्वाद बसवारूढ मठाचे सद्गुरू शिवपुत्र महास्वामीजीं दिले. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा, असुरांचा व अंधकारमय बाबींचा नाश केला आणि मानवाला प्रकाशमान जीवन प्राप्त करूंन दिले या अनुषंगाने दिपोस्तव साजरा करण्यात आला असल्याचे एम के फाऊंडेशन संस्थापक-अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सांगितले.

याप्रसंगी मंचावर बसावरुढ माठाचे सद्गुरु श्री शिवपूत्र महास्वामीजी, माजी नगरसेवक श्री श्रीनिवास करली, शिवसेना शहरप्रमुख श्री सचिन गंधारे, हिंदू राष्ट्र सेनेचे श्री आनंद मुसळे, याराना ग्रूप चे श्री सचिन माने , सागर सिमेंटचे डीलर श्री बसवराज ठक्का, सामाजिक कार्यकर्ता श्री परमेश्वर चौघुले, श्री शरनु मुलगे, श्री मनोहर माचर्ला यांच्यासह एम के फाउंडेशनचे सर्व संचालक तसेच भागातील माता भगिनी व नागरिक उपस्थित होते.
दीपोत्सव च्या उपक्रमाला भाविकांचा बहुमोल प्रतिसाद लाभल्या बद्दल उपक्रमाचे आयोजक महादेव कोगनुरे यांनी सर्वाचे आभार मानले.