Mangalvedha : राज्य परिवहन मंगळवेढा बसस्थानकावर ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा

मंगळवेढा (प्रतिनिधी): आपण सर्व भारतीय नागरिक ग्राहक आहोत. ग्राहकांना संरक्षण मिळावे. त्यांना काही अधिकार मिळावेत. यासाठी आपल्या संसदेने २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा एकमताने मंजूर केला. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशभर सर्व स्तरावर ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. सद्यस्थितीत या कायद्यात काही सुधारणा करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे २०१९ साली यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करून सुधारित ग्राहक संरक्षण कायदा २०१९* मंजूर करण्यात आला. तो २० जुलै २०२० पासून अंमलात आला. त्याची माहिती सर्व ग्राहक/नागरिकांना व्हावी. त्यांचे प्रबोधन व्हावे. यासाठी दरवर्षी १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालावधी ग्राहक प्रबोधन ग्राहक जागृती पंधरवडा म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्याप्रमाणे राज्य परिवहन मंगळवेढा बसस्थानकावर दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी ‘ राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे औदुंबर ढावरे उपस्थित होते. तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल गडदे हे देखील उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात एस टी महामंडळ कडून देण्यात येणाऱ्या विविध सवलतींची माहिती देण्यात आली. तसेच प्रवाशांना शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना महिलांना गुलाब पुष्प देऊन ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढा आगाराचे आगार प्रमुख संजय भोसले हे उपस्थित होते.

तसेच सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विठ्ठल भोसले, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक रावसाहेब चव्हाण, आगार लेखाकार योगेश कांबळे,वाहतूक नियंत्रक संतोष चव्हाण, वरिष्ठ लिपिक परमेश्वर भालेकर, धनाजी पाटील, अमोल काळे, लिपिक वेदिका सूर्यवंशी, विद्या सगर, प्रियंका मोरे, वाहक अमोल शिनगारे, गणेश गवळी, सविता सुरवसे, सचिन माने तसेच प्रवासी बांधव व रा प कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
