अक्कलकोटहून श्री तुळजाभवानी यात्रेकरूंना प्रसाद वाटपाचा शुभारंभ — श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या उपक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सहभाग
अक्कलकोट (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार, अक्कलकोट यांच्या वतीने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनास जाणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी वळसंग टोल नाका येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, मिलन कल्याणशेट्टी, शैलेस पिसे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, न्यासाचे सचिव शामराव मोरे, तसेच अनेक मान्यवर व गावातील प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या मनोगतातून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सेवा कार्याचा गौरव करताना सांगितले की, “संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मागील ३८ वर्षांपासून अन्नदान सेवेचा परंपरागत वारसा सुरू आहे. गेल्या २४ वर्षांपासून श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान सेवा ही श्री भगवान शंकराच्या अक्षय पात्राप्रमाणे अखंड सुरू आहे.”
तसेच माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी आपल्या मनोगतातून मंडळाच्या कार्याचा गौरव करत, संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, विश्वस्त मंडळ, सेवेकरी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
या वेळी अविनाश मडिखांबे, वळसंग सरपंच जगदीश आंटद, प्रथमेश इंगळे, श्रीशैल दुधगी, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले, संजय गायकवाड, महादेव होटकर, शफिक पटेल, अल्ताफ पटेल, सिद्धाराम कोडले, मलकप्पा कोडले, विजयकुमार देशपांडे, नाना भोसले, महेश कुलकर्णी, महेंद्र बंडगर, यासीन कटरे, शन्मुख स्वामी, अनिल बर्वे, सिद्धारुढ काळे, श्रीशैल भूसुनगी, हुसेनी कुरेशी, दिनेश नाडगोंडा, वीरेश बागलकोटी, विनायक सुरपुरे, धर्मराज गुंजले, शिलामनी बनसोडे, दाऊद आमलीचुंगे, सिद्धेश्वर तिपरादी, शांतकुमार गायकवाड, नागप्पा स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!