प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये पालक मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा….
(मुरूम प्रतिनिधी ता.5) : येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या सभागृहात शनिवारी (ता. ४) रोजी पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एस. एस. हुळळे होत्या. यावेळी अजहर इनामदार, माजी मुख्याध्यापक सच्चिदानंद अंबर, मुख्याध्यापक अनुराधा जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर , संगमेश्वर लामजणे, धनराज हळळे, विरेंद्र लोखंडे, सुभाष धुमाळ, पंकज पाताळे, सागर मंडले, नेहा माने, शितल घोडके, अश्विनी क्षीरसागर, सोनाली कारभारी, तनुजा जमादार , प्रभावती कलशेट्टी, साधना शेवाळकर, गीता सत्रे, सरस्वती जाधव, सरोजा सारणे, सुधाराणी पाटील, श्रीदेवी मंडले, पुजा मरबे, साक्षी देशमाने, जास्मिन मुल्ला आदींनी परिश्रम घेऊन विविध विषयांवर चर्चेत सहभाग नोंदवला. प्रास्ताविक इंदिरा व्हट्टे यांनी केले. पालक व शिक्षक यांच्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, शिस्त, खेळ, सांस्कृतिक उपक्रम तसेच डिजिटल शिक्षणाच्या योग्य वापराबाबत सविस्तर चर्चा झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार जगदीश सुरवसे यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!