जि. प. शाळा मुळेगावच्या मुख्याध्यापिका कवयित्री हाफिजा बागवान लिखित “सोनचाफा” काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न
दिनांक ०५-ऑक्टोबर-२०२५ रोजी कवयित्री हाफिजा बागवान लिखित “सोनचाफा” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या राहत्या घरी परिवाराच्या सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हाफिजा बागवान यांच्या काव्यसंग्रहाचे विविध स्थरातून कौतुक होतं आहे. या काव्यसंग्रहास प्रख्यात कवयित्री माधुरी चौधरी यांची प्रस्तावना लाभली आहे तर पाठराखण जेष्ठ कवयित्री अनिसासिकंदर यांनी केली आहे. या काव्यसंग्रहच्या प्रकाशन सोहळ्यास शिक्षक सैपन बागवान, डॉ. समीर बागवान, डॉ. शिफा बागवान, इंजिनिअर साहिल बागवान, तहेसीन बागवान व ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्थेचे केंद्रिय उपाध्यक्ष खाजाभाई बागवान उपस्थितीत होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!