मीरा-भाईंदर,ठाणे मुंबई येथील स्वामी भक्तांकडून अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात
अक्कलकोट – तालुक्यातील रामपूर,बोरी उमरगे,मिरजगी, कंठेहळळी गावातील सुमारे 100 पुरग्रस्थ कुटुंबांना मीरा-भाईंदर,ठाणे मुंबई येथील स्वामी भक्तांकडून मदतीचा हात देत दैनंदिन जीवनोपयोगी अन्नधान्य पदार्थ असलेले किट वाटप करून आधार देण्याचा अनुकरणनीय कार्य केल्याबद्दल नागरिकांतून आनंद व्यक्त करत आहे.
नुकतेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापुराने नदीकाठचा शेकडो गावांना तडाखा बसले असून नदीकाठाचे लोकांना खूप नुकसान झाले आहे. अनेक गावामध्ये अनेक घरे पूर्ण पाण्यात होते.शेतीचे खूप मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या गावातील गोरगरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक संघ संस्था पुढे सरसावले असून मीरा-भाईंदर,ठाणे मुंबई येथील स्वामी भक्त असलेले नेहमी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणारे मुंबई येथील विजय पाटील, अभिराज मोरे, प्रदीप पटणे, महेश घोगरे,विजय पाटील, महेश मालुसरे, प्रतीक सुर्वे मित्र परिवारातर्फे अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त लोकांना दैनंदिन जीवनोपयोगी अन्नधान्य पदार्थ किट रामपूर,बोरी उमरगे, मिरजगी, कंठेहल्ली या गावातील प्रत्यक्ष नुकसानग्रस्थ सुमारे 100 कुटुंबांना वितरण करून मनाचे मोठेपणा दाखविले आहे.मदतीचे हात मिळाल्याने सर्व कुटुंब आणि ग्रामस्थ आनंदित झाले होते.
पूरग्रस्त मदत वितरण साठी विजय पाटील मित्रमंडळाचा सहकारी तोळनूर येथील श्रीशैल रब्बा, शरणप्पा फुलारी, रविकुमार देगांव,जकापूरचे भागण्णा पाटील,आकाश समाणे,कंठेहळळीचे दस्तगीर जमादार आदींचे सहकार लाभले शरणप्पा फुलारी यांनी स्वागत केले तर श्रीशैल रब्बा आभार मानले.
फोटो ओळ :-तालुक्यातील रामपूर,बोरी उमरगे,मिरजगी, कंठेहळळी गावातील सुमारे 100 पुरग्रस्थ कुटुंबांना मीरा-भाईंदर,ठाणे मुंबई येथील स्वामी भक्तांकडून मदतीचा हात देत दैनंदिन जीवनोपयोगी अन्नधान्य पदार्थ असलेले किट वाटप करताना विजय पाटील, अभिराज मोरे, प्रदीप पटणे, महेश घोगरे,विजय पाटील, महेश मालुसरे, प्रतीक सुर्वे, श्रीशैल रब्बा, शरणप्पा फुलारी, दस्तगीर जमादार ,रविकुमार देगांव,भागण्णा पाटील,आकाश समाणे, दस्तगीर जमादार
Back to top button
×
No WhatsApp Number Found!