गावगाथा

वागदरी ग्रामपंचायतीत थकबाकीदाराचा सत्कार : कर वसुली मोहिमेला वेग

थकबाकी वसूल मोहीम

वागदरी ग्रामपंचायतीत थकबाकीदाराचा सत्कार : कर वसुली मोहिमेला वेग

अक्कलकोट (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत वागदरी येथे कर वसुलीला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचे थकबाकीदार श्री शिवशरण रेवप्पा यमाजी यांनी रुपये 24,000 थकबाकीसह आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायतीस भरले. त्यांच्या या जबाबदार नागरिकत्वाचा सन्मान म्हणून ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

हा सत्कार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री शिवानंद परमेश्वर घोळसगाव, उपसरपंच श्री पंकज मलकप्पा सुतार आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री राजेंद्र कणमुसे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला.

ग्रामपंचायतीकडून सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे की, शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वागदरी ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीस ₹50 लाखांचे आणि जिल्हास्तरावर अव्वल ठरणाऱ्यास ₹1 कोटीचे रोख बक्षीस मिळणार आहे.

वागदरी ग्रामपंचायत अनेक क्षेत्रांत अग्रेसर असून आता कर वसुली 100% करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत आपला कर भरून ग्रामविकासाच्या या उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांनी केले आहे.

— ग्रामपंचायत वागदरी 🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button