गावगाथा

पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी कीटचे वितरण; अक्कलकोट घडामोडी सोशल फाउंडेशनचा उपक्रम

सामाजिक बांधिलकी

पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी कीटचे वितरण; अक्कलकोट सोशल फाउंडेशनचा उपक्रम

सोशल मीडियावर आवाहनानंतर अनेकांनी दिली मदत — तसेच ४५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचा खर्च उचलला

अक्कलकोट (दि. १२ ऑक्टोबर) — या वर्षी अक्कलकोट तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टी मुळे पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी अक्कलकोट घडामोडी सोशल फाउंडेशन तर्फे ५० हून अधिक शेतकऱ्यांना “दिवाळी कीट” वाटप करण्यात आले.

या कीटमध्ये चुरमुरे, रवा, मैदा, बेसन, साखर, तेल, साबण (मैसूर सँडल), उटणे, चिवडा मसाला आदी साहित्यांचा समावेश होता. तसेच, कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री स्वामी समर्थ समाधी मठात महाराजांच्या चरणी कीट अर्पण करून मुख्य पुजारी धनंजय पुजारी यांच्या मंत्रोच्चाराने पूजन विधी संपन्न झाला.

तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार म्हणून करजगी येथील २७ विद्यार्थी, शावळ येथील ८ विद्यार्थी, आणि मोट्याळ येथील १० विद्यार्थी एकूण ४५ विद्यार्थ्यांना २८ हजार १२५ रुपये दहवीच्या परीक्षा शुल्काचा खर्च उचलला आहे.

विशेष म्हणजे, फेसबुकवरील ‘अक्कलकोट घडामोडी सोशल’ या समूहातील सदस्यांनी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आवाहनानंतर उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग घेत.
“फुल ना फुलाची पाकळी” या भावनेतून देणगीदारांनी या उपक्रमासाठी आर्थिक मदत केली. या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद चौगुले व सचिव धोंडप्पा नंदे यांनी सर्व देणगीदार आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले व सर्वांचे आभार व्यक्त केले.

या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद चौगुले, सचिव धोंडप्पा नंदे, कार्याध्यक्ष्य स्वामी चौगुले, तसेच सदस्य दीपक चौगुले, कल्याणराव मांठळे, संतोष राठोड, गणेश गोब्बुर, समर्थ जाधव, पप्पू वाघमारे आदी उपस्थित होते. सर्व सदस्य आणि देणगीदारांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button