विद्यार्थ्यांनो रॅगिंग करू नका
कठोर शिक्षा होईल ;ज्योती गाजरे
कल्याणशेट्टी महाविद्यालयात अँटी रॅगिंग कार्यशाळा
महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम
अक्कलकोट :
शाळा महाविद्यालय तसेच वसतिगृहातून विद्यार्थ्यांवर सीनियर विद्यार्थ्यांकडून रॅगिंग चे प्रकार होतात. रॅगिंग ही अमानुष पद्धत आहे. बंधू भावाने वागणे हा आपला मानवी स्वभाव असतो. परंतु रॅगिंग केल्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी होते असा सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचा गैरसमज झाला आहे. रॅगिंग केल्याचे निदर्शनास आल्यास कठोर शिक्षा सुनावली जाते, म्हणून विद्यार्थ्यांनी रॅगिंग पासून दूर राहावे असे प्रतिपादन निर्भय पोलीस ज्योती गाजरे यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अँटी रॅंकिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निर्भय पथकातील मनीषा चिंचोळे, नीता बिराजदार उपस्थित होत्या. व्यासपीठावर महिला विकास कक्षेच्या डॉ शितल झिंगाडे-भस्मे, प्रा मनीषा शिंदे, प्रा शितल फुटाणे, प्रा हर्षदा गायकवाड, प्रा विद्याश्री वाले, प्रा विद्या बिराजदार उपस्थित होत्या.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नीता बिराजदार म्हणाल्या की, विद्यार्थिनीची छेडछाड होत असेल तर निर्भया पथक सदैव मदतीसाठी तत्पर असते. विद्यार्थ्यांनी सुद्धा नीतिमत्तेने वागावे मोबाईल चा वापर अभ्यासासाठी करावा, त्यातून नवीन ज्ञान घ्यावे वाईट गोष्टी सोडून द्याव्यात रॅगिंग पासून दूर राहावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा शितल फुटाणे यांनी केले सूत्रसंचलन डॉ शितल झिंगाडे-भस्मे यांनी केले. आभार प्रा प्राची गणाचारी यांनी मानले.
कार्यशाळेस उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सचिन दादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, जूनियर विभाग प्रमुख पुनम कोकळगी, सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.
चौकटीतील मजकूर
पोलीस आपले मित्र आहेत निष्कारण त्यांची बदनामी करू नका..
विद्यार्थी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी रॅगिंगच्या आहारी जातात. ग्रुपमध्ये स्वतःचे वर्चस्व सिद्ध करतात. शेवटी त्यांना पोलिसांच्या कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागते, कठोर शिक्षा झाल्यानंतर विनाकारण पोलिसांना दोष दिला जातो बदनामी केली जाते परंतु पोलीस आपले मित्र असतात हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे असे मनीषा शिंदे यांनी कार्यशाळेस उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सांगितले.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात महिला विकास कक्ष व रासेयो विभागाच्या वतीने अँटी रॅगिंग कार्यशाळा प्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी
Back to top button
×
No WhatsApp Number Found!