पूरग्रस्तांना दि पूना मर्चंटस चेंबरचा मदतीचा हात : भमू,परंडा तालूक्यातील आपत्तीग्रस्तांना धान्यांचे वाटप
पुणे : नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे भूम, परंडा तालुक्यातील अनेक गावांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. आठवडाभरानंतरही जनजीवन विस्कळीतच आहे. अनेक संसार उघड्यावर आले आहेत. शेतीसह घरांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. पशुधन गमावल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे सामाजिक जबाबदारीचे भान बागळत पुण्यातील दि पुना मर्चंटस चेंबरतर्फे भूम, परंडा ताक्यात एक हजार धान्यांच्या कीटचे सोमवारी वाटप करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील उळूप, साडेसांगवी, बुर्हाणपूर, चिंचपूर ढगे, सुकटा, चिंचोली या गावात नदीच्या पूराचे पाणी शिरले होते, तर परंडा तालुक्यातील वाघे गव्हाण या गावात पाणी शिरल्याने घरांसह पशुधनाचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टी आणि पूरामुळे येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. आपत्तीच्या या धक्क्यातून अनेक जण अद्यापही सावरलेले नाहीत. या कठीण काळात एक छोटीशी मदत म्हणून धान्यांच्या रूपाने दि पूना मर्चंटस चेंबरतर्फे प्रत्यक्ष गावात जावून ग्रामस्तांना धान्यांच्या कीटचे वाटप करण्यात आले.
दि पूना मर्चंटस चेंबर ही व्यापारातली शिखर संस्था आहे. राज्यासह देशात ज्या ज्या वेळी संकटे आली त्या त्या वेळी ही संघटना मदतीचा हात देते. याआधी किल्लारी भुकंपानंतर या संघटनेने त्या भगात मोठे मदतकार्य केले होते. दि पूना मर्चंटस चेंबरचे सचिव इश्वर नहार, संचालक दिनेश मेहता, सदस्य हरिराम चौधरी, भरत भाटे, प्रणव गुगळे यांनी प्रत्यक्ष गावांत जावून मदत केली. धाराशिव जिल्हा प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे, तहसीलदार जयंवत पाटील, नायक तहसिलदार अमर आटोळे, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत साळुंके, सहशिक्षक समाधान शिकेतोड यांनी सहकार्य केले. अशी माहिती दि पूना मर्चटस चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.
चौकट
मदतीमुळे ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंदाश्रू
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीमुळे गावातील प्रत्येक घटक संकटात सापडला आहे. बाधितांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती मदतीचा हात देत आहेत. पुण्यातील दि पूना मर्चंटस चेंबरतर्फे धान्यांची मदत मिळताच साडेसांगवी, सुकटा, चिंचोली या गावातील ग्रामस्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. काही ज्येष्ठ ग्रामस्तांनी आश्रू पुसत दि पूना मर्चटस चेंबरच्या पदाधिकार्यांना आशीवार्ददिले.
चौकट
राजस्तान फाऊंडेशतर्फे भांड्यांचे वाटप
पुण्यातील राजस्तान फाऊंडेशतर्फे आपत्तीग्रस्त भागातील ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशा कुटुंबांना गृहउपयोगी वस्तूंची आवश्यकता होती. त्यामुळे 650 कुंटुंबांना गृहउपयोगी भांड्यांच्या कीटचे वाटप करण्यात आले. या फाऊंडेशनचे संपर्क मंत्री ओकप्रकाश चौधरी, एम. आर. सूर्या सोशल फांऊडेशनचे कुलदीप पाटील, रमेश चौधरी, अरविंद चौधरी यावेळी उपस्थित होते.
———–
Back to top button
×
No WhatsApp Number Found!