गावगाथा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा २१ लाखांचा निधी सुपूर्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दातृत्वाचे कौतुक

सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा २१ लाखांचा निधी सुपूर्त ;
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दातृत्वाचे कौतुक

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ रु. २१ लाखांचा धनादेश श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सोलापूर येथील कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आला.

दरम्यान, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात म्हणून अन्नछत्र मंडळाने जीवनावश्यक धान्य शिधा किट्स — एकूण ५ हजार किट्स (रु. ५० लाख किमतीच्या) — जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त केल्या. तसेच, मंडळाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था (संस्थापक अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले, सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले) यांच्या माध्यमातून १ हजार पूरग्रस्त महिलांना साडी-चोळी संच मदत म्हणून देण्यात आले.

सोलापूर-मुंबई विमान सेवेच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला. या वेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ, पालक मंत्री ना. जयकुमार गोरे, परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, स्टार एअर लाईन्सचे संजय घोडावत, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, भाजपा प्रांतिक सदस्य शहाजीराजे पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त राजेश कुमार, महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


🟩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अन्नछत्र मंडळाच्या दातृत्वाचे कौतुक
सोलापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत अन्नछत्र मंडळाने दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रशंसा केली. मंडळाच्या वतीने आधीच ५ हजार धान्यकिट्स व १ हजार साड्या पूरग्रस्तांना देण्यात आल्या असून, आता अतिरिक्त २१ लाखांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ देण्यात आला आहे. धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसलेअमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.


🟦 अन्नछत्र मंडळाकडून अभीष्टचिंतन
सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अभीष्टचिंतन करून शुभेच्छा देण्यात आल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button