सिद्धरामेश्वर माझा विसावा’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न — “पुस्तक युवकांसाठी प्रेरणादायी” : दशरथ वडतीले
सोलापूर:
सोलापुरातील नवोदित लेखक निलेश महामुनी लिखित “सिद्धरामेश्वर माझा विसावा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार पेठेतील कालीका मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतीले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गिरीश देवरमनी, चंद्रकांत वानकर, विनायक महिंद्रकर, चंद्रकांत वेदपाठक, वसंतराव महामुनी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, निलेश धाराशिवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात दशरथ वडतीले यांनी म्हटले की,
“हे पुस्तक फक्त नंदीध्वज यात्रेचा अनुभव नाही, तर श्रद्धा, संयम आणि प्रेरणेचा प्रवास आहे. युवकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल.”
लेखक निलेश महामुनी यांनी सांगितले की,
“ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या चौथ्या नंदीध्वजावर विसावा पूर्ण करताना आलेले अनुभव, नंदीध्वज मास्तरांचे मार्गदर्शन आणि त्यावेळी झालेल्या भावनिक क्षणांना मी शब्दबद्ध केले आहे. विशेष म्हणजे, हे पुस्तक मी कारागृहात असताना पूर्ण केले.”
या प्रसंगी मानाच्या पाचव्या नंदीध्वजाचे मुख्य मास्तर शिवयोगी बनशेट्टी, सोमनाथ मेंडके, प्रसाद कुमठेकर, कुमार शिरसी तसेच नंदीध्वजधारक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!