वागदरी पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शिवराज (मंत्री) पोमाजी रिंगणात; युवांचा गळ्यातील ताईत ठरण्याची चर्चा
वागदरी (ता. अक्कलकोट) —पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शिवराज (मंत्री) पोमाजी उतरण्याची संकेत दिले आहे यामुळे
राजकीय वातावरण तापले आहे. सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध, भागातील प्रत्येक गावाशी असलेला घनिष्ठ लोकसंपर्क आणि विशेषतः तरुण वर्गातील लोकप्रियता यामुळे या निवडणुकीत अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.
शिवराज पोमाजी हे पूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना अनेक विकासाभिमुख कामे करून गावाच्या प्रगतीत मोलाची भर घातली आहे. स्वतःच्या जोरावर ग्रामपंचायत निवडणूक जिंकून दाखवणारे ते एकमेव तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गावातील पाणीपुरवठा, रस्ते, शैक्षणिक सोयी, तसेच युवकांच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी पंचायत समिती निवडणुकीत ते पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. “जनतेने मला पुन्हा एकदा संधी दिली, तर मी संधी सोनं करून दाखवेन. भागातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांना रोजगार, शिक्षण आणि पाण्याचा प्रश्न या सर्व बाबींवर प्राधान्याने काम करीन,” असे ते आत्मविश्वासाने म्हणाले.
गावातील तसेच परिसरातील युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शिवराज पोमाजी हे या निवडणुकीतील बलाढ्य उमेदवार ठरतील, अशी चर्चा वागदरी पंचायत समिती गणात रंगू लागली आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!