अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत ‘जनसेवा हीच माझी ओळख’ सांगत स्वामीनाथ शिवाजी चौगुले चर्चेत…
अक्कलकोट (प्रतिनिधी):
अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २ मधून इच्छुक उमेदवार म्हणून स्वामीनाथ शिवाजी चौगुले हे नाव सध्या सोशल मीडियावर तसेच शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. ‘जनसेवा हीच माझी ओळख’ या ब्रीदवाक्यासह चौगुले यांनी लोकसंपर्क मोहीम सुरू केली असून त्यांच्या हटके आणि वैशिष्ट्यपूर्ण पोस्टमुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच वातावरण तापले आहे.
सध्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच अक्कलकोटमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या स्वामीनाथ चौगुले हे समाजसेवक म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षांपासून अक्कलकोट तसेच पुणे येथे विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे.
स्वामीनाथ चौगुले हे आपल्या वार्डातील नागरिकांशी सतत संपर्कात राहून त्यांच्या समस्या, अडचणी यांची दखल घेतात. आरोग्य शिबिरे, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, तसेच गरीब व गरजूंना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, रुग्णालयातील बिल माफ करण्यासाठी पाठपुरावा यांसारख्या उपक्रमांत ते सतत सक्रिय राहिले आहेत.
चौगुले यांनी सामाजिक कार्यातून तयार केलेला जनसंपर्क हा त्यांचा मुख्य बळ मानला जातो. प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी घराघरात जाऊन संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
येत्या नगरपरिषद निवडणुकीत जनतेने आपल्याला संधी दिल्यास “आणखी जोमाने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे शहर व वार्डाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प पूर्ण करीन”, असे मनोगत स्वामीनाथ शिवाजी चौगुले यांनी व्यक्त केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!