गावगाथा
चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ.पूजा सागर दादा कल्याणशेट्टी यांनाच उमेदवारी द्यावी — सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी
ओमराज बसवराज बाणेगाव : “दादांच्या नेतृत्वाखाली चपळगावचा सर्वांगीण विकास साध्य होईल”

चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून पूजा सागर दादा कल्याणशेट्टी यांनाच उमेदवारी द्यावी — सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी
ओमराज बसवराज बाणेगाव : “दादांच्या नेतृत्वाखाली चपळगावचा सर्वांगीण विकास साध्य होईल”
चपळगाव :
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चपळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय, सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध असलेले आणि जनतेचा विश्वास संपादन करणारे युवा नेते सागर दादा कल्याणशेट्टी यांचे नाव जोरदार चर्चेत आहे.
हन्नूर गावचे उपसरपंच म्हणून काम करताना सागर दादांनी शेतकरी, कामगार, तरुण, महिला अशा सर्व घटकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विकासकामांसाठी प्रामाणिकपणे झटणारा आणि लोकांशी जवळीक राखणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
बैलगाडी शर्यतीचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांनी परंपरा, संस्कृती आणि ग्रामीण जीवनातील एकात्मता जपली आहे. त्याचबरोबर संघटनात्मक बांधणीद्वारे पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून भारतीय जनता पक्षाचे कार्यक्षेत्र अधिक बळकट करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
सागर दादा हे केवळ राजकारणी म्हणून नव्हे तर “जनतेचा सोबती, सर्वांसाठी उपलब्ध आणि नेहमीच कामात पुढे असलेला माणूस” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघाला विकासाची नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करत आहेत.

भाजप कार्यकर्ते ओमराज बसवराज बाणेगाव यांनी सांगितले की, “सागर दादा हे कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधतात. त्यांच्या नेतृत्वात विकासाची गती, जनतेचा विश्वास आणि युवा उर्जेचा संगम आहे. त्यामुळे पक्षाने चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सागर दादा कल्याणशेट्टी यांनाच उमेदवारी द्यावी, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी आहे.”



