लेखक – कवी सांस्कृतिक लोकशाही समृद्ध करतात : डॉ. श्रीपाल सबनीस
कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार प्रदान सोहळा मंचर या शांता बाईच्या गावी शरदचंद्र पवार सभाग्रहात रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाला . प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांचे शुभ हस्ते महाराष्ट्र राज्यातील आणि राज्याबाहेरील एकोणचाळीस साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . सन २०२३ व २०२४ या सालाकरिता है पुरस्कार साहित्य प्रकारातील कादंबरी, कथा संग्रह कविता संग्रह, गझल संग्रह हायकू चारोळी वात्रटिका संग्रह, नाटक, अनुवाद, अभंग, संपादित साहित्य या सर्व प्रकारातील उत्कृष्ट साहीत्यकृतीची निवड करून प्रदान करण्यात आले.
यावेळी जेष्ठ साहित्यिक प्रा. साईनाथ पाचारणे, प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर, वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबईचे संपादक प्रा. नागेश हुलवळे, आध्यात्मिक साहित्यिक बबनराव हिराबाई किसनराव पाटील, सौ ललिता श्रीपाल सबनीस, निसर्ग प्रतिष्ठानचे सचिव वैभव टेमकर डॉ नंदकुमार पोखरकर, सावळेराम पाडेकर हे उपस्थित होते.
समाज व संस्कृतीच्या शुद्धीकरणासाठी साहित्यिक कलावंतांचे योगदान महत्वाचे असते. त्यावरच समाज विकास अवलंबून असतो. लेखक कवी सांस्कृतिक लोकशाही समृद्ध करतात. शांताबाई शेळके यांनी त्यांच्या बहुआयामी कर्तुत्वाने साहित्य कलेत सुगंध पेरला. त्यांची बहुसांस्कृतिक पुण्याई जगवण्याचा प्रयत्न शांत शेळके प्रतिष्ठान व प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे करत आहेत. संस्कृतीच्या जागरणातून शुद्ध प्रबोधन होत असते. असे विचार डॉ श्रीपाल सबनीस यांनी येथील शांता शेळके प्रतिष्ठानच्या साहित्य गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात व्यक्त केले. डॉ श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा शांताबाईच्या काव्य कर्तुत्वाने प्रभावित आहे. त्यांची गोड अवीट गाणी मराठी मनात घर करून बसली आहेत. नव्या लेखकांनी त्यांचा वारसा समृद्ध करावा. शांता शेळके संस्कृतीच्या आदर्श नायिका आहेत.
या वेळी सत्कार मूर्तीच्या वतीने बबनराव पाटील, श्री ललित अधाने, सौ निर्मला शेवाळे, यांनी मनोगत व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे यांनी सुरेल कविता सादर केली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून प्रतिष्ठानच्या कामाची माहिती दिली. आभार ज्ञानेश्वर धुमाळ यांनी मानले. या सोहळ्याचे नियोजन श्री बाळासाहेब कातारी श्री कुंडलिक वाळूंज सर, सौ सगुणा बाणखेले यांनी पाहिले . सूत्रसंचालन प्रा .सौ स्नेहल भोर यांनी केले .
Back to top button
×
No WhatsApp Number Found!