गावगाथा

३६ वर्षांनंतर श्री व्यंकटेश विद्यालय, वलांडी स्नेह मेळावा व गुरूजनांचा गौरव सोहळा

माजी विद्यार्थी मेळावा

३६ वर्षांनंतर श्री व्यंकटेश विद्यालय, वलांडी
स्नेह मेळावा व गुरूजनांचा गौरव सोहळा

(मुरुम बातमीदार)

श्री व्यंकटेश विद्यालय वलांडी ता.
देवणी जि. लातूर येथील ई.स. १९८८ ८९ च्या
इयत्ता दहावीच्या वर्ग मित्रांचा स्नेह मेळावा व गुरु
गौरव समारंभ संपा. तब्बल ३६ वर्षांनी कुमारवयातील
आठवणींना उजाळा देत वयाची पन्नाशी ओलांडल्या
नंतरच्या प्रवासातील अनेक घटनांना व गुरुजनांनी
दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरी वरच प्रवास सर्व वर्गमित्रांनी
गुरुजनांसमोर कथन केला. सर्व प्रथम दीपप्रज्वलन
करून विद्यालयाचे स्वर्गीय मुख्याध्यापक गिरीधरराव
पाटील, इतिहास विषय शिक्षक स्व. शिंबरराव पाटील,
शाळेचे सचिव स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर
, लिपीक स्व. प्रल्हाद कटके यांच्या स्मृतीस अभिवादन
करण्यात आले. तसेच या जून्या व हाडांच्या
शिक्षकांच्या निधनाने व आठवणीने अनेक विद्यार्थी
गहीवरले. हलका धुकट सकाळचा बारा. श्री व्यंकटेश
विद्यालय’ हे फलक तसंच थोडं झिजलेलं, पण
अभिमानानं उभं. या शाळेच्या गेटसमोर एकेक गाडी
थांबते. आतून ओळखीचे चेहरे उतरतात. कुणाचं
केस पांढरं झालंय. कुणी चष्मा लावलेला, पण
डोळ्यातलं चमकणारं बालपण अजून जिवंत. ३६ वर्षांनी
पुन्हा एकदा एकत्र आलेले तब्बल ६० माजी
विद्यार्थी हसरे चेहरे, हलकीशी ओढ, आणि मनात
एकच प्रश्न किती बदललो रे आपण ?
असाच प्रश्न फक्त नजरेने एकमेकांना विचारत होते..
हातात कॅमेरे, मोबाईल पण क्षण टिपण्या आदीच
अनेकांच्या डोळ्यांत पाणी. जुन्या बाकाकडे पहताना
कोणी हलकंसं हसत, कोणी फोटो काढत, कुणाचातरी
मन भुतकाळात हरवत त्या निरागस दिवसाच्या
गंधात गाणी, विनोद आणि आठवणी चा पाऊस. पण
तरीही काही नजरा एकमेकांना शोधतात. माजी विद्यार्थी
यांचे अनुभव कथन. हशा आणि आसवं सगळ
जणू एका सिनेमासारखं घडतंय. सर्व जणाचे एकत्र
स्नेहभोजन… नजरेत आओळख, मनात भावना, आणि
ओठावर एकच शब्द पुन्हा भेटू. विद्यार्थी स्नेह
मेळावा हा माजी विद्यार्थी साठी आयुष्यभरासाठी
आठवणीचा नाही तर एक भावनिक प्रेम. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष श्री
व्यंकटराव पाटील, तत्कालीन शिक्षक , संस्था
सहसचिव तथा सेवानिवृत गटशिक्षणाधिकारी नागोराव
भोसले मुख्याध्यापक मांजीबाळे एम. बी. गणिताचे
शिक्षक खंडेराव बिरगे, शिवाजी भोसले, कडव्या
शिस्तीचे शाळेचे कडक पर्यवेक्षक शिवाजी ऊमाटे,
दिलीप कुलकर्णी, डी. डी. पाटील गुरुजी आदीची
प्रमुख उपस्थीती होती. स्नेह मेळावाचे आयोजन श्री
शिवराज पंचगल्ले, अजिज सौदागर, जलील बौडीवाले,
चंद्रकांत माने यांनी पुढाकार घेतला. व इतर सर्व
वर्गमित्रांच्या सहकायाने गुरुजनाचा गुण गौरव व
स्नेहमेळावा पार पाडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button