*वळसंग पंचायत समीतीसाठी प्रा.महादेव होटकर यांना पहिली पसंती.*
सध्या जिल्हापरिषद आणि पंचायत समीतीच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून ग्रामीण भागातील प्रत्येक चावडीवर याचीच चर्चा रंगल्याचे चित्र दिसत आहे.
यंदा वळसंग पंचायत समीती गटासाठी मागासवर्गीय प्रवर्ग आरक्षित झाल्याने अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत परंतु अनेक हौशे गौशे नवशे विविध पक्षांकडून गुडघ्याला बाशिंग बांधून पक्षाच्या तिकिटासाठी विविध मार्गाने मोर्चे बांधणी करून आपल्या गुप्तहेरां मार्फ़त आपण इच्छुक असल्याचे संदेश आपालपल्या नेत्यांपर्यंत पोहोचवत आहेत.
परंतु या सर्व हौश्या गौश्या आणि नौश्याना बाजू सरकवत यंदा जनसामान्यातून एक नाव प्रामुख्याने पुढे येत आहे ते वळसंग गावचे माजी सरपंच प्राध्यापक महादेव होटकर यांचं वळसंगच्या राजकारणात सर्वात लहान वयाचे आणि उच्च शिक्षित निर्व्यसनी ज्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकिर्दित वळसंग गावाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार,स्वच्छ ग्राम पुरस्कार,आरोग्यग्राम पुरस्कार,महात्मा गांधी गाव तंटामुक्तिचा विशेष राज्य स्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून वळसंग गावात १००% बंद गटार योजना आणि
जलस्वराज्य प्रकल्प योजना यशस्वीपणे राबविली गेली,
अंगणवाड़ीला महात्माफुले स्वच्छ सुंदर अंगणवाड़ी पुरस्कार,
सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार,महिला बचत गटातुन महिला महासंघाची निर्मिती या व अशा शासनाच्या अनेक योजना माजी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तथा गट प्रमुख तथा माजी सरपंच श्रीशैलकाका दुधगी यांच्यासह माजी पंचायत समिति सदस्य सोनुताई कलशेट्टी, माजी सरपंच सिद्धाराम कोडले,माजी सरपंच सुरेश माशाळे,माजी सरपंच कासिमसाब अमलीचुंगे यांच्यासह गावचे माजी उप सरपंच,सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व समविचारी नागरिकांना सोबत घेऊन वळसंग गावाचा सर्वांगीण विकास साधला,दलित वस्ती शेजारी असलेल्या विहिरीची खोली वाढउन बंद पडलेली विहीर पुन्हा पूनुरुज्जीवीत करण्यात माजी सरपंच महादेव यांचा मोलाचा वाटा आहे.
वळसंग गावाला सतत भेड़सावणारी पिण्याच्या पाण्याची टचाई लक्षात घेऊन गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या दिंडुर येथील हुतात्मा तलाव, वळसंग येथील सातय्या तलाव आणि वळसंग येथील श्री सिद्धेश्वर तलावाच्या खोलीकरणासाठी अहोरात्र पाठपुरावा करून त्याची खोली वाढ़वीली परिणामी यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तीन्ही तलाव तुडूंब भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.गेल्यावेळेला वळसंग जिल्हापरिद गटातुन उमेदवारीचे प्रमुख दावेदार म्हणून महादेव होटकर यांचे नाव आघाडीवर असताना केवळ वरीष्ठांची मर्जी राखण्यासाठी जनतेचा प्रचंड आग्रह असताना देखील स्वतःला मिळालेल्या सुवर्ण संधीचा हसत हसत त्याग केला नुसता त्याग न करता तितक्याच प्रामाणिकतेने आणि जिद्दीने पक्षाने दिलेली जवाबदारी ईमाने एतबारे निभावत विजयाची पताका फड़कवली.
प्राध्यापक माहादेव होटकर यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून तसेच प्रत्यक्ष कृतितून आध्यात्म,सुसंस्कारीपणा,सर्वधर्म समभाव आणि छत्रपती शिव,शाहू, फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आचरण होताना दिसते.वळसंग पंचक्रोशितिल प्रत्येक घरात प्राध्यापक महादेव होटकर यांना अजातशत्रु म्हणून ओळखले जाते.या भागातील लिंगायत समाजात महादेव होटकर यांची एक वेगळी छाप असून दलित,मुस्लिम यांच्यासह सर्वच समाजातील न्याय निवाड़ा विविध पंचायती शासकीय कामं असोत किंवा पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी असो तसेच वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या माध्यमातून अक्कलकोटला देशातील विविध भागातुन पायी चालत येणाऱ्या पालख्याच्या मुक्कामाची व्यवस्था असेल किंवा शेकडो स्वामी भक्तांच्या राहण्या आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी अहोरात्र धडपड करणाऱ्या वळसंग गावच्या माजी सरपंच प्राध्यापक महादेव होटकर यांनीच यंदा वळसंग पंचायत समीती गणातून निवडणुक लढवावी अशी नागरिकांतून मागणी जोर धरु लागली असून प्रस्थापित हौशे गौशे आणि नौशे यांना जनतेने संधी दिली असताना ही त्या संधीचं सोनं करण्या ऐवजी त्यांनी त्याची माती केली असून जनतेला ना हक्काचे घरकुल मिळाले न गोर गरीबांसाठीच्या कोणत्या ही शासकीय योजनांचा लाभ मिळाला त्यामुळे आता मागासवर्गीय उमेदवार म्हणून प्राध्यापक महादेव होटकर यांच्या नावाला दुजोरा आणि मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याने वळसंग पंचायत समीती गणातून पक्षाचे तिकीट वाटप करताना महादेव होटकर यांच्याकड़े दुर्लक्ष करून चालणार नाही कारण महादेव होटकर हेच जनतेचा कौल असून जनता हीच जनार्धन आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!