त्रिपुरारी, कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोटात लाखो भाविकांची उपस्थिती; श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचे आयोजन
अक्कलकोट : (प्रतिनिधी) “अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…!” या जयघोषात त्रिपुरारी, कार्तिक पौर्णिमेनिमित्त बुधवारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात विधिवत पूजा-अर्चा पार पडली. त्यानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने प्रसादाचा लाभ घेतला.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाप्रसाद, यात्रीनिवास, यात्रीभवन यासह विविध उपक्रम भक्तांच्या सेवेकरिता सज्ज ठेवण्यात आले होते. या पौर्णिमेनिमित्त राज्यभरातून दिंडी आणि पालख्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे दाखल झाल्या होत्या. यातील भाविकांची सोय न्यासामार्फत उत्तम रीतीने करण्यात आली.
तीर्थाटन आणि पर्यटन यांचा संगम घडवणाऱ्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात विविध आकर्षक उपक्रम भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात दत्त मंदिर, स्वामींचा रथ, श्रीमंत कांतामतीराजे भोसले वाचनालय, अश्रयदाते कक्ष, स्वामी सदन-धान्यकोठार, सभागृह, कार्यालय, सिंहासनस्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वामींची भव्य ३० फुटी उभी मूर्ती, दीपमाळा, वारूळातून प्रकटलेले परब्रह्म, कपिला गाय, शिवस्मारक, श्री गणेश मंदिर, श्री शमी विघ्नेश गणपती मंदिर, हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी बग्गी, आऊटडोअर जीम, यात्री भवन, यात्री निवास, अतिथी निवास, रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, एटीएम, श्री स्वामी समर्थ वाटिका, बालोद्यान, जॉगिंग ट्रॅक आणि वाहनतळ यांसारख्या सोयी निर्माण करण्यात आल्या आहेत.
भाविकांनी श्रींच्या दर्शनानंतर महाप्रसाद घेतला आणि परिसरातील पर्यटनस्थळांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
चौकट : राज्याबाहेरून आलेले भक्त :
महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात, दिव-दमन, उत्तराखंड, काश्मीर, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतून लाखो भाविकांनी श्रीक्षेत्र अक्कलकोटात येऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबर अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतला.
More Stories
ब्रेकिंग! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी
कृपासिंधू सोशल फाउंडेशन कडून अस्थिव्यंग व मतिमंद निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार शालींचे वाटप……..
बासलेगावमध्ये श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा : ३ ते ५ डिसेंबर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल