राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात वागदरीच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी!
बेंगळुरू, नोव्हेंबर :
टाटा पावर लिमिटेड आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगळुरू येथे आयोजित ‘ऊर्जा मिलान’ या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात श्री एस. एस. शेळके प्रशाला, वागदरी येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
प्रशालेतील इयत्ता आठवी (अ) मधील वैष्णवी नामदेव कदम आणि अंबिका संजय जेऊरे या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या “लाईफ सेव्हिंग स्टिक फॉर फार्मर” या अभिनव वैज्ञानिक उपकरणाची महाराष्ट्र विभागातून राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा, वायूऊर्जा, जैवइंधन आणि पुनर्वापरक्षम ऊर्जा या विषयांवर विविध अभिनव प्रकल्प सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘मून मॅन ऑफ इंडिया’, चांद्रयान निर्माते डॉ. माईलस्वामी अण्नादुराई यांनी भूषवले होते.
या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जिज्ञासा वाढविणे, स्वच्छ व शाश्वत ऊर्जेच्या वापराविषयी जागरूकता निर्माण करणे आणि नवोन्मेषी विचारांना चालना देणे हा होता. विजयी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रकल्पामागे विज्ञान शिक्षक इमामकासिम बागवान, शिवशरण गवंडी, दत्तात्रय होटकर, प्रदीप पाटील, शिवलिंगप्पा गंगा, शंकराचार्य स्वामी, मल्लम्मा सोमेश्वर आणि आरती बिराजदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री बसवराज शेळके सावकार, प्राचार्य अनिल देशमुख, पर्यवेक्षिका शैलशिल्पा जाधव, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 💐
🧪 विज्ञान व नवोन्मेषाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थिनींनी गाठलेले हे यश प्रेरणादायी ठरले आहे. 🌟
More Stories
ब्रेकिंग! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी
कृपासिंधू सोशल फाउंडेशन कडून अस्थिव्यंग व मतिमंद निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार शालींचे वाटप……..
बासलेगावमध्ये श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा : ३ ते ५ डिसेंबर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल