पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा वाढदिवस व ‘सिंहायन’ आत्मचरित्र प्रकाशन सोहळा; श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गौरव समारंभ संपन्न
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पत्रमहर्षी, पद्मश्री आदरणीय डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या आत्मचरित्र ‘सिंहायन’ प्रकाशन सोहळ्यानिमित्त विशेष सत्कार कार्यक्रम न्यासाच्या वतीने संपन्न झाला. या प्रसंगी माजी खासदार निवेदिताताई माने उपस्थित होत्या.
दरम्यान, जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र आणि पुष्पहार अर्पण करून डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सन्मान करण्यात आला. कोल्हापूर येथील पोलिस मुख्यालयासमोरील क्रीडांगणावर हा अभिष्ठचिंतन सोहळा उत्साहात पार पडला.
या प्रसंगी दै. पुढारी सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक संजय पाठक, गणेश कुलकर्णी, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त भाऊ कापसे, खजिनदार लाला राठोड, पालखी संयोजक संतोष भोसले, मधुकर सुरवसे, शिवराज स्वामी, सायबन्ना जाधव, जनसंपर्क अधिकारी प्रशांत भगरे, महांतेश स्वामी आणि संतोष माने* आदी मान्यवर उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!