गावगाथाठळक बातम्या

Akkalkot Rural | केंद्रस्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत नागणसुर कन्नड मुली शाळेचे उज्वल यश

अक्कलकोट (प्रतिनिधी ): जिल्हा परिषद सोलापूर, पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांच्या विकास करण्यासाठी आयोजित केलेल्या केंद्रस्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध (टॅलेंट हंट) स्पर्धेत नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळेने सर्व सहा विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने पालक,ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले आहे.

दर वर्षी केंद्र,तालुका आणि जिल्हा स्तरावर निबंध,वक्तृत्व,कथाकथन,चित्रकला,समूह गीतगायन,लोकनृत्य असे विविध स्पर्धा घेतले जातात.या स्पर्धा अंतर्गत नागणसुर कन्नड मुली शाळेने सांघिक समूह गीतगायन लहान गटात प्रथम क्रमांक आणि मोठा गटात प्रथम क्रमांक पटकावले आहे.लोकनृत्य स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक व मोठा गटात द्वितीय क्रमांक पटकावले आहे.कथाकथन लहान गटात ईश्वरी बसवराज धनशेट्टी हिने स्पर्धेत प्रथम क्रमांक,चित्रकला लहान गटात प्रांजली इरण्णा शिवमूर्ती हिने प्रथम क्रमांक पटकावले आहे.मोठा गट कथाकथन स्पर्धेत अक्षरा विश्वनाथ कल्याण हिने प्रथम क्रमांक तर श्रावणी श्रीमंत गंगोंडा हिने द्वितीय क्रमांक पटकावले आहे.लहानगट वक्तृत्व स्पर्धेत श्राव्या सागर यळमेली प्रथम क्रमांक पटकावली आहे.लहान गट निबंध स्पर्धेत सविता शिवणणा खिल्लारी हिने तृतीय क्रमांक पटकावली आहे. असे विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील उपशिक्षक राजकुमार खानापुरे,राजकुमार नरूणे, राजशेखर कुर्ले,लक्ष्मीकांत तळवार ,शांता तोळनुरे ,शोभा कलशेट्टी , शरणप्पा फुलारी आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे ,विस्तार अधिकारी लक्कप्पा पुजारी,केंद्रप्रमुख इरप्पा गजा,केंद्रीय प्रभारी मुख्याध्यापक विजयश्री एंटमन कन्नड मुली शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शरणप्पा फुलारी, कल्याणी गंगोंडा,मालकप्पा हिप्परगी, चन्नम्मा बिराजदार शंकर अजगोंडा ,बसवराज खिलारी ,रामेश्वर सोलापुरे,शरद गंगोंडा तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक बंधू भगिनी ,सरपंच,उपसरपंच,तंटामुक्त अध्यक्ष सर्व ग्रामपंचायत सदस्य, समस्त ग्रामस्थ,पालक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाधर भोसगी,उपाध्यक्ष बसवराज तेग्गीनकेरी, शिक्षणतज्ञ गुरुबाई प्रचंडे,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सिद्धेश्वर गंगोंडा आदींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button