सुदीप मुनोळी चित्रकला विभागात तालुकास्तरीय प्रथम क्रमांक
अक्कलकोट
अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या लहान गट मुला-मुलींसाठी तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत चित्रकला प्रकारात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मैंदर्गी कन्नड मुलांची शाळेची विध्यार्थी सुदीप मुनोळी याला प्रमाणपत्र व पदक देवून सत्कार करण्यात आले.
गुरुवारी अक्कलकोट येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत वैयक्तिक स्पर्धेमध्ये चित्रकला, भाषण, कथाकथन, निबंध आणि सामूहिक स्पर्धेमध्ये लोकनृत्य आणि गट गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मैंदर्गी कन्नड मुलांची शाळेने समूहनृत्य, समुहगायन व चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतले होते. प्रत्येक विभागामध्ये प्रथम, द्वितीय, त्रितीय तीन क्रमांकांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षण विस्ताराधिकारी सोमशेखर स्वामी व लक्कप्पा पुजारी यांनी चित्रकला प्रकारात प्रथम क्रमांक मिळविलेल्या सुदीपचा प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव केला. बीआरसीचे गणेश अंबुरे, शिक्षक शिवानंद गोगाव, अंबाराया उजनी, शिक्षिका संगीता राठोड, भौरम्मा पोमाजी, अश्विनी शंबरगी आदींसह अनेकजण उपस्थित होते. बीईओ प्रशांत अरबाळे, मुख्याध्यापक श्रीशैल हडलगी, मैंदर्गी केंद्रप्रमुख महादेव पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धराम जकापुरे, सुशीलाबाई स्वामी, विजयकुमार गुंडद, संगीता राठोड, राजश्री उप्पीन, अश्विनी शंबरगी, व मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सदानंद कोळी, रमेश जुजागर, शिवणगी यांनी अभिनंदन केले.
फोटो –
तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेच्या लहानगट स्पर्धेतील चित्रकला विभागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मैंदर्गी कन्नड मुलांची शाळेची विध्यार्थी सुदीपा मुनोळी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शिक्षण विस्ताराधिकारी सोमशेखर स्वामी यांनी प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित केले. लक्कप्पा पुजारी, गणेश अंबुरे शिवानंद गोगाव, अंबाराय उजनी आणि इतर शिक्षक उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!