एनटीपीसीचा ५१ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात संपन्न
सोलापूर : एनटीपीसी सोलापूर प्रकल्पात एनटीपीसीचा ५१ वा स्थापना दिवस आणि सुवर्ण महोत्सव अत्यंत उत्साहाने आणि आनंदात साजरा करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली,त्यानंतर प्रकल्पप्रमुखांनी एनटीपीसीचा ध्वज फडकावून संस्थेच्या गौरवशाली ५० वर्षांच्या प्रवासाचा स्मरण केला.
या प्रसंगी बी.जे.सी.शास्त्री,कार्यकारी संचालक (एनटीपीसी सोलापूर) यांनी सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करताना संस्थेच्या सुवर्ण प्रवासाचा आढावा घेतला आणि सर्वांना सुरक्षा,गुणवत्ता व नवोन्मेष यांच्या बळावर सतत प्रगती करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान पॉवर एक्सेल आणि एम्प्लॉयी ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करून कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम व उत्कृष्ट योगदानाचा गौरव करण्यात आले.
या प्रसंगी बी.जे.सी.शास्त्री,कार्यकारी संचालक (एनटीपीसी सोलापूर), एम.के.बेबी,मुख्य महाव्यवस्थापक (प्रचालन व अनुरक्षण), सुभाष एस. गोखले,महाव्यवस्थापक (अनुरक्षण व प्रशासन), तसेच सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी यांनी आपली मान्यवर उपस्थिती दर्शविली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!