वागदरी पंचायत समिती निवडणुकीत,
जिवलगांचा सामना रंगणार का…?
वागदरी परिसरात पंचायत समिती निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून,भाजपाकडून घोळसगावचे सरपंच राजशेखर कीवडे हे आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अलीकडेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेल्या भव्य फ्लेक्स,जल्लोषमय कार्यक्रम आणि झालेल्या शक्तिप्रदर्शनाने त्यांच्या प्रभावाची झलक दाखवून दिली आहे.
राजशेखर कीवडे यांनी घोळसगाव व परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण करत जनतेत विश्वास निर्माण केला आहे.सामाजिक,धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांमधील त्यांचा सहभाग हा त्यांना लोकाभिमुख नेता बनवणारा घटक ठरला आहे.
दुसरीकडे,काँग्रेसकडून सतीश पालापूरे यांनी या निवडणुकीसाठी इच्छुकता दर्शवली आहे.विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष असलेले पालापूरे हे काँग्रेस विचारसरणीशी निष्ठावान आणि संघर्षशील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्वकीयांचा विरोध पत्करूनही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले असून,सामाजिक क्षेत्रात त्यांचा मजबूत जनसंपर्क आहे.
युवक चेहरा,शिक्षण आणि जनसंपर्क यांचा संगम
उच्चशिक्षित,प्रामाणिक आणि काँग्रेसच्या विचारांशी निष्ठावान असलेले सतीश पालापुरे हे पक्षातील उदयोन्मुख युवक नेतृत्व मानले जाते.सर्व पक्षीयांशी सलोख्याचे संबंध आणि स्थानिक पातळीवर तयार झालेलं मजबूत मैत्रीचं जाळं हे त्यांचे मोठं बलस्थान आहे. जनतेत चांगली पकड आणि तरुणाईचा पाठिंबा यामुळे काँग्रेसकडून त्यांचं नाव जोरदार चर्चेत आहे.
आता या दोघा जिवलग मित्रांमध्येच रंगणार का वागदरी पंचायत समितीची थरारक लढत…?
स्थानिक राजकारणात,
“विकास विरुद्ध विचार,मैत्री विरुद्ध पक्षनिष्ठा”
असा संघर्ष बघायला मिळणार का,
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!