विद्यार्थ्यांनो स्वदेशीचा पुरस्कार करा नवराष्ट्राची निर्मिती होईल..प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात विद्यार्थी दिनानिमित्त कार्यक्रम
अक्कलकोट :
अद्ययावत तंत्रज्ञानामुळे स्वदेशी वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी स्वदेशी वस्तु खरेदीस प्राधान्य द्यावे, त्यामुळे देशाचा जागतिक स्तरावर नवराष्ट्र म्हणून नावलौकिक होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थी दिन व वंदेमातरम गीत लेखनास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशहितासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जाण विकसित केली पाहिजे, आत्मविश्वासाच्या बळावर जीवनावश्यक स्वदेशी वस्तू निर्मितीचे तंत्र अवगत केले पाहिजे, स्वदेशीचा प्रचार समाजामध्ये करून देशाच्या आर्थिक विकासामध्ये योगदान दिले पाहिजे.
मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, विद्यार्थी हेच देशाचे भावी नागरिक आहेत. तंत्रज्ञान विज्ञान व नव संशोधनामुळे विद्यार्थ्यांची प्रगती झाली आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी देखील देश विकासासाठी नवनवीन संकल्प केले पाहिजेत. विकसित भारताचे स्वप्न साकार केले पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, आभार प्रा भीम सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमास कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार, प्रा डॉ शितल झिंगाडे-भस्मे, प्रा हर्षदा गायकवाड, प्रा शिल्पा धूमशेट्टी उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
विद्यार्थी दिनानिमित्त पंचप्पा कल्याणशेट्टी कौशल्य विकास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सादर केले वंदेमातरम गीत..
वंदेमातरम गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामुदायिक संपूर्ण वंदेमातरम गीत सादर केले, मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात विद्यार्थी दिन कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी व विद्यार्थी.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!