*अक्कलकोट तालुका काँग्रेसमध्ये वागदरी पंचायत समिती साठी सतीश पालापुरे यांनी*
*उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केले.*
आज अक्कलकोट तालुका काँग्रेस कार्यालय येथे वागदरी पंचायत समिती निवडणुकीसाठी आमचा अधिकृत उमेदवारी मागणीचा अर्ज देण्यात आला.
या वेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील,ज्येष्ठ नेते व जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशपाक भाई बाळोरगी,तसेच युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष निशांत कवडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.
या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली
काँग्रेस पक्षाने दिलेल्या विचारधारेवर,विकासाच्या निष्ठेवर आणि सामान्य माणसाच्या आवाजाला बळ देण्याच्या हेतूने आम्ही ही उमेदवारी मागणी केली आहे.
वागदरी परिसरातील लोकांच्या आशीर्वादाने आणि काँग्रेस परिवाराच्या एकजुटीने आम्ही विकास आणि न्यायासाठी हे पाऊल उचलले आहे.
जनतेच्या प्रेमाने आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाने हे कार्य मजबूत होईल,
असा ठाम विश्वास आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!