गावगाथा

*वळसंग जिल्हापरिषद आणि पंचायत समीती गणात भाजपाला विजयाची संधी तर कॉंग्रेसच्या नेत्यांना मात्र यंदा आत्मचिंतनाची गरज भासणार?*

राजकीय विश्लेषण -✍🏻पत्रकार-अल्ताफभाई म.पटेल.*

*वळसंग जिल्हापरिषद आणि पंचायत समीती गणात भाजपाला विजयाची संधी तर कॉंग्रेसच्या नेत्यांना मात्र यंदा आत्मचिंतनाची गरज भासणार?*
—————————————————–
*✍🏻पत्रकार-अल्ताफभाई म.पटेल.*
मो-8180060031
—————————————————–

*”विश्लेषण”*

कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या वळसंग जिल्हापरिषद पंचायत समीती गणातून यंदा जिल्हापरिषदेसाठी इतर मागासवर्गीय आणि पंचायत समीतीसाठी मागासवर्गीय प्रवर्ग राखीव झाल्याने अनेकांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत तर सर्वच पक्षातील जुन्या उमेदवारांना उमेदवारी नकोच असा सूर मतदार आणि कार्यकर्त्यांमधून उमटू लागल्याने पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतील हा देखील तितक्याच उत्सुकतेचा विषय बनला आहे.
सध्या जिल्हापरिषदेसाठी सुरेश हसापुरे, भाजप कडून रामप्पा चिवड़शेट्टी आणि महेश बीराजदार यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु असली तरी हसापुरे यांनी आपला पक्ष कोणता हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवल्याने त्यांच्या उमेदवारी वरुन अंतर्गत वादळ सुरु आहे तर स्थानिक उमेदवार देण्याची मागणी ही जोर धरत आहे परंतु हसापुरे जिल्हापरिषदेची उमेदवारी मिळाली तर खालच्या उमेदवाराचा आर्थिक ताण कमी होणार असल्याने खालचे उमेदवार गरज सरो वैद्य मरोच्या भूमिकेत आहेत त्यांना हसापुरे यांच्या विजयापेक्षा हसापुरे यांचे आर्थिक पाठबळ महत्वाचे असल्याने हसापुरे यांनी वळसंग जिल्हापरिषदेची उमेदवारी घेताना आपल्याच गोटात पडद्यामागे काय चालले आहे याची चाचपणी करणं आवश्यक आहे.
—————————————————–
*रामप्पा सावकार की महेशदादा?*
याउलट रामप्पा चिवडशेट्टी आणि महेश बिराजदार यांच्यात कमालीचे सामंजस्य आणि वादळा पुर्वीची शांतता स्पष्ट जाणवत आहे.
तर वळसंग पंचायत समीतीसाठी बलवान गोतसुरवे, महादेव होटकर आणि गेल्यावेळेला थोडक्यात निसटता विजय मिळालेले संजय गायकवाड़ यांची नावे चर्चेत आहेत.
—————————————————–
*कॉंग्रेसला मतदान म्हणजे त्याच तिकीटावर पुन्हा तोच खेळ:-*
येकंदरीत वळसंग जिल्हापरिषद आणि पंचायत समीती गणातून कॉंग्रेस पक्षाची परिस्थिती पाहता जनतेचा सूर कॉंग्रेस नको असाच आहे.मतदार आणि सर्वसामान्य नागरिकांतून गेल्या वेळेला निवडून दिलेल्या सदस्यांप्रति प्रचंड नाराजी दिसत असून निवडणुकी वेळी दिलेल्या एका ही आश्वासनाची पूर्तता या सदस्यानी केली नाही म्हणून पुन्हा त्याच मतदारांसमोर तेच उमेदवार म्हणजे त्याच तिकीटावर पुन्हा तोच खेळ करून नाकर्ते उमेदवार लादले जात असल्याने जनता गेल्या वेळी झालेल्या फ़सवणुकीचा बदला घेण्यासाठी आतुर आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव स्पष्ठ दिसत असून कॉंग्रेसच्या उमेदवारांना जनता यंदा आत्मचिंतन करावयास भाग पाडणार आणि नवीन चेहऱ्याना संधी देणार हे स्पष्ट दिसत आहे.
—————————————————–
*कॉंग्रेसच्या नाकर्तेपणामुळे भाजपला यशाची मोठी संधी:-*
अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून अक्कलकोट हे सध्या सोलापुर जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभाव आणि समय सूचकता पाहता यंदा जिल्हापरिषद आणि पंचायत समितिच्या राजकारणात मोठे फेर बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य सांस्थाच्या निवडणुकीवर लक्ष ठेऊन दूरदृष्टी असणाऱ्या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आधीच आपल्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करून सोलापुर जिल्हा कृषि उत्पन्नबाजार समीती तथा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा तथा कार्यकारिणी आणि भाजपा युवा मोर्चा च्या कार्यकारीणीवर अनेकांची नेमणुक करून भविष्यातील वादळ वर्तमानातच शांत केल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपात बंड होण्याची शक्यता मावळली आहे.
—————————————————–
*कॉंग्रेसला आत्मपरीक्षण करावे लागणार:-*
सत्ता असून ही जनतेची रेंगाळलेली कामे आणि निवडून दिलेल्या उमेदवारांची राजकीय उदासीनता कायम एकलाचलो आणि हेकेखोरीची भूमिका कार्यकर्त्यांना नेहमी अपमानाची वागणुक, कॉंग्रेस विरोधी पक्षांसोबत छुपी हात मिळवणी करून विरोधकाना बळ देण्याचे षड्यंत्र करणारेच आता पुन्हा दलीत आणि मुस्लिम समाजाला भुरळ घालण्याच्या तयारित असून वळसंग गावात कॉंग्रेस शिवाय कोणत्या ही पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळू नये यासाठी देखील जोर लावला जात असल्याची चर्चा सध्या वळसंग जिल्हापरिषद गटात सर्वत्र होताना दिसत आहे.
—————————————————–
*महादेव होटकर यांना संधी:-*
एकेकाळी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून वळसंग गावचे माजी सरपंच प्रा.महादेव होटकर यांची ओळख असून अभ्यासु,शांत,संयमी आणि वळसंग पंचक्रोशितिल प्रगल्भ राजकीय क्षमता असलेले म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांनी जवळपास सर्वच निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळताना अनेकवेळा विजयश्री खेचुन आणली आहे परंतु स्वपक्षीयांचा विश्वास घात आणि षडयंत्राला कंटाळून गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे सद्स्यत्व स्वीकारून सक्रिय सहभाग नोंदवत वळसंग गावात भाजपला आतापर्यंतची मतांची ९५० इतकी अर्वाधिक लीड मिळउन देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत.जातीय समीकरणाचा इतिहास पाहिल्यास कॉंग्रेसच्या सोनुताई कलशेट्टी यांच्या समाजाची लोकसंख्या संपूर्ण पंचायत समिति गणात शंभरच्या आसपास असताना ही त्यांना तब्बल ११६० इतकी लीड मिळाल्याचा इतिहास आहे त्यामुळे प्रा.महादेव होटकर यांच्या उमेदवारीचा देखील भाजप पक्ष श्रेष्ठीना गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
—————————————————–
*बलवान गोतसुरवे ही दावेदार.*
गेल्या वेळेला सुशीलकुमार शिंदे,प्रणिती शिंदे,सिद्धाराम म्हेत्रे,श्रीशैल नरोळे यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांची साथ असलेल्या संजय गायकवाड़ सारख्या प्रस्थापित उमेदवाराला हैराण करून नाकी नउ आणून सोडणारे बलवान गोतसुरवे हे देखील पुन्हा एकदा आपले नशीबी आजमावण्यासाठी आतुर आहेत परंतु बलवान गोतसुरवे यांना उमेदवारी मिळाली तर पुन्हा वळसंग गाव विरोधकांसाठी मोकळे सोडल्याने येथे एकतरफा मतदान होऊन भाजपाल मोठे नुकसान होउ शकते आणि त्याच दृष्टीने सध्या बलवान गोतसुरवे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी कॉंग्रेसच्याच अनेक इच्छुक उमेदवारांनी आतून शर्थीने प्रयत्न सुरु केले असल्याची कुजबुज सुरु आहे.
बलवान गोतसुरवे यांना उमेदवारी दिल्यास कॉंग्रेस वाल्याना वळसंग वन वे मोकळे राहील असा त्यांचा विश्वास आहे.
म्हणून बलवान गोतसुरवे की महादेव होटकर? हा देखील भाजप समोर प्रश्न असून तिकीटाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.
—————————————————–
*यांच्या उमेदवारीकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही:-*
वळसंग जिल्हापरिषद आणि पंचायत समीती मतदार संघातील दलित मुस्लिम आणि अल्पसंख्यक मतदारांची संख्या पाहता
वळसंग जिल्हापरिषद निवडणुकीत ऐच्छिक उमेदवार म्हणून भाजपचे यासीन कटरे,प्रहारचे मोहसिन तंबोळी, उ बा ठा सेनेचे आरिफ कुरेशी यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे ही भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने फ़ायदयाचे ठरणारे नाही.
—————————————————–
*अक्षय गायकवाड़ आणि सिद्धाराम वाघमारे यांच्या ही नावाची चर्चा:-*
पूर्वी मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी वर काम केलेले सिद्धाराम वाघमारे यांच्या मागे कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही परंतु वळसंग ग्रामपंचायत निवडणुकीत सिद्धाराम वाघमारे यांच्या धर्मपत्नीनी माजी सरपंच श्रीशैल दुधगी यांना उमेदवारी देऊन निवडून आणले त्यानंतर सिद्धाराम वाघमारे यांनी सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून वळसंग येथील दलित वस्ती येथे सिमेंट कॉंक्रीट रोड, पाण्याची टाकी यांसह विकास कामे केली आहेत.
सध्या त्यांच्या पत्नी आणि ते पुणे येथे वास्तव्यास असून वळसंग येथे त्यांची येजा असते ते देखील त्यांनी केलेल्या कामांच्या माध्यमातून भाजप तर्फे उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत.
त्याच बरोबर सेंट्रिंग कॉन्ट्रेक्टर असलेले युवा राजकारणी म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे विश्वासू अक्षय गायकवाड़ यांनी देखील त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे आपली ओळख निर्माण केली आहे त्यांनी अनेक समाजउपयोगी कार्यक्रम तथा उपक्रम राबविले असून ते देखील वळसंग पंचायत समीतीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत.
—————————————————–
*रामप्पा चिवडशेट्टी आणि महेश बिराजदार यांचे पारडे जड़:-*
गेल्या अनेक वर्षापासून वळसंग जिल्हापरिषदेच्या प्रत्येक गावातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रात आपली आगळी वेगळी छाप निर्माण करणारे महेश बिराजदार यांचे नाव ही सध्या जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रकर्षाने समोर आले आहे.त्यांनी या भागात दिलेल्या अनेक महत्वपूर्ण सामाजिक योगदानामुळे त्यांची येथील युवा वर्गात मोठी लोकप्रियता निर्माण झाली असून होटगी येथील रामप्पा चिवडशेट्टी यांचे ते जावई देखील आहेत.रामप्पा चिवडशेट्टी यांनी गेल्या सोलापुर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वळसंग येथील मलकप्पा कोडले यांचा पराभव केला होता त्यामुळे जातीय समीकरण,जावई महेश बिराजदार यांचे कार्य आणि स्थानिक नेते तथा आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे पाठबळ त्यांना मिळत असल्याने सध्या या सासरे आणि जावई यांचे भाजपात पारडे जड़ आहे.
त्यामुळे संधीचं सोनं न करता आलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराना घाम गाळावा लागणार तर आहेच शिवाय पक्षातिल कार्यकर्त्यांची झालेली गळती नाराजी आणि कॉंग्रेस पक्षाच्या हेकेखोरीला कंटाळून भारतीय जनता पार्टी कड़े आकर्षित झालेला दलित आणि मुस्लिम समाजाची मनं दुबार कॉंग्रेसकड़े वळविणं इतक्यात तरी शक्य नाही.
म्हणून कॉंग्रेसला यंदाच्या निवडणुकीत निश्चितच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणि भाजपाला गुलाल उधळण्याची संधी येणार असल्याचं चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
*✍🏻पत्रकार-अल्ताफभाई म.पटेल.*
मो-8180060031
—————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button