*वळसंग पंचायत समीती गणातून भाजपाचे महादेव होटकर आणि सर्वपक्षीय संजय गायकवाड़ यांच्यातच सरळ सरळ लढत होण्याची संभावना ?*
*✍🏻पत्रकार-अल्ताफभाई म.पटेल.*
मो-8180060031
—————————————————–
*”विश्लेषण”*
वळसंग जिल्हापरिषद आणि पंचायत समीती गणात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मोठे उलटफेर होण्याची शक्यता पहावयास मिळत आहे.
*भारतीय जनता पार्टिच्या उमेदवारा विरुद्ध सर्वपक्षीय उमेदवार.*
सध्या भारतीय जनता पार्टी आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची विजयी घोड़दौड रोकण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले असून त्यांनी स्थानिक पातळीवर आघाडी निर्माण करून भाजपच्या उमेदवाराला लक्ष्य करण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याचे बोलले जात आहे.
त्यातच सोलापुर जिल्हा कृषि उत्पन्न बाज़ारसमीतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे सुरेश हसापुरे यांनी उघड उघड आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटात प्रवेश करत उमेदवारी मिळउन निवडून ही आले आता हसापुरे यांनी आपले लक्ष जिल्हापरिषदेच्या निवडणुकीवर ठेवत त्यादृष्टीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली होती परंतु त्यांच्या विरोधात भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी बंडाळी केल्याने त्यांच्या उमेदवारिवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे आणि कांहींनी हसापुरे यांच्या मजबूत आर्थिक परिस्थितीचा स्वतःच्या निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी हसापुरे यांना वळसंग जिल्हापरिषद गणातून उभे करण्याचा कुटील डाव खेळला परंतु वेळीच हसापुरे यांनी तो डाव ओळखून वळसंग गणातून निवडणूकच न लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते त्यामुळे हसापुरे यांच्या जीवावर स्वतःच्या जीवाची मुंबई करायला नीघालेल्यांची घोर निराशा झाली असल्याचे समजते.
या उलट भारतीय जनता पार्टीच्या गोटात जिल्हापरिषद आणि पंचायत समीतीच्या उमेदवारी वरुन गोंधळ उडालेला दिसत नसून भाजप पक्षश्रेष्ठी,इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान आणि शांतता दिसत आहे.
सध्या वळसंग पंचायत समीती गणातील इच्छुक उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभावीपणे वळसंगचे माजी सरपंच प्राध्यापक महादेव होटकर यांच्या नावाची तर सर्वपक्षीय उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे माजी जिल्हापरिषद सदस्य ऍड संजय गायकवाड़ यांच्यातच प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
———————————————
*भाजपची विकास कामांच्या जोरावर निवडणूक,कॉंग्रेसकड़े प्रचाराचे मुद्दे काय?*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ज्यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणुक जिंकली असे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी झपाट्याने अक्कलकोट विधामसभा मतदार संघाचा विकासात्मक काया पालट करण्याचा सपाटा लावला तालुक्यात पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांची फ़ळी निर्माण केली सभासद नोंदणी अभियानात राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शाबासकी मिळविली,विशेषत: अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील जवळपास सर्वच गावांना कोट्यावधीचा निधी दिला असून वळसंग,आचेगाव,लिंबीचिंचोळी आणि दिंडुर या गावावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची विशेष मर्जी आणि लक्ष आहे त्यांना या भागातून विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेली लीड ही मोठी आहे तसेच पुर्वाश्रमीचे कॉंग्रेस पक्षाचे श्रीशैल नरोळे यांनी देखील आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नेतृत्व स्वीकारुन जि कृ उ बा समीतीत आपली विजयी पताका रोवल्याने त्यांची ही भाजपच्या उमेदवाराला मोठी मदत होणार आहे त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी फारशी अडचणीची ठरणारी नसल्याचे दिसत आहे,आचेगावात श्री शावरसिद्ध महाराजांच्या मंदिर परिसरातील सभा मंडप आणि तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तब्बल चार कोटीचा निधी दिला असून दिंडुर गावाला ही सुमारे एक कोटीचा निधी दिला असून वळसंग गावाच्या विकासासाठी लाखोंचा निधी दिल्याने भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचारात हे मुद्दे महत्वाचे ठरू शकतात. या उलट गेल्या ११ वर्षा पासून मध्यंतरीची अडीच वर्षे वेगळता केंद्रात आणि राज्यात सत्तेत नसलेल्या कॉंग्रेस पक्षाची स्थिति नाजुक आहे,पक्षाअंतर्गत नाराजी,अकार्यक्षम नेतृत,कार्यकर्त्यांनी गमावलेला आत्मविश्वास,कॉंग्रेस मधून इतर पक्षात झालेले कार्यकर्त्यांचे स्थलांतर याला रोकण्यात कॉंग्रेसचे नेते कमी पड़ले आहेत.
तशातच विधानसभेच्या निवडणुकीत कधी मुस्ती तर कधी सलगर आणि अक्कलकोट इथं गुप्त बैठका घेऊन पक्षाविरोधी काम केल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आपल्या नेत्यांवरिल विश्वास उडाला असून याचा फटका निश्चितच कॉंग्रेसच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.
———————————————
*भाजपा तर्फे प्रा.महादेव होटकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित?*
वळसंग गावचे माजी सरपंच प्राध्यापक महादेव होटकर यांनी पक्षातील नेते मंडळीच्या जाचाला कंटाळून कॉंग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत मिलनदादा कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनात भाजपचे सक्रिय सद्स्यत्व स्वीकारले त्यांनी भाजपचे सद्स्यत्व स्वीकारल्या पासून आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि मिलन कल्याणशेट्टी यांनी दिलेली पक्षाची कामं जवाबदारीने पूर्ण केली आहेत त्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा महादेव होटकर यांच्यावरील विश्वास वाढला आहे.
म्हणून महादेव होटकर यांची भाजपतर्फे उमेदवारी निश्चित समजली जात आहे.
———————————————
*महादेव होटकर आणि संजय गायकवाड़ यांच्यातच चुरस असणार.*
कॉंग्रेस कडून वळसंग पंचायत समीतीसाठी उमेदवारी नेमकी कुणाला हे अजून गुलदस्त्यात असले तरी पूर्वी एकाच पक्षात काम केलेले परंतु आता एकमेकांच्या विरोधात दंड ठोकुन निवडणुकीच्या रिंगणात उतरु पाहणारे माजी सरपंच प्रा.महादेव होटकर आणि माजी जिल्हापरिषद सदस्य संजय गायकवाड़ यांच्यातच खऱ्या अर्थाने कलगीतुरा होणार आहे, दोघे ही वळसंग गावतुन आणि मागास प्रवर्गातुन येणारे असल्याने यांच्यात उमेदवारी वरुन पक्षाअंतर्गत ही नेहमीच रस्सी खेच राहिली आहे. परंतु समाजात एक आदर्श सरपंच आणि नेहमीच कार्यकुशल नेतृत्व म्हणून कोणते ही पद नसताना देखील जनतेची कामं पूर्ततेस नेण्याचा हथकंडा असलेल्या महादेव होटकर यांना उमेदवारी मिळाल्यास महादेव होटकर यांचे पारडे जड़ होणार असल्याने त्यांना भाजप कडून ही उमेदवारी मिळू नये यासाठी गनिमीकाव्याचा वापर चालू असल्याचे देखील बोलले जात आहे.
तर कांही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा कृ उ बा समीतीच्या निवडणुकीत वळसंग पंचायत समीतीसाठी इच्छुक उमेदवारांपैकी कांहीनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाच्या विरोधी उमेदवाराला ग्रामपंचायत गटातुन उभारलेल्या उमेदवाराला मतदान केल्याची चर्चा आहे तर वळसंग बुथवर होटगीच्या उमेदवाराला पडलेल्या मतांवरुन तसे उघड उघड दिसत ही असल्याची सध्या चर्चा जोरात रंगली आहे त्यामुळे महादेव होटकर हे जरी भाजपात नवखे असले तरी त्यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलेली जबाबदारी पूर्णतः निभावली असल्याने त्यांचा विश्वास जिंकण्यात बाजी मारल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे वळसंग पंचायत समीतीसाठी भजपकड़ून महादेव होटकर यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब होउन सर्वपक्षीय उमेदवार संजय गायकवाड़ यांच्यातच प्रमुख लढत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
*✍🏻पत्रकार-अल्ताफभाई म.पटेल.*
मो-8180060031
Back to top button
×
No WhatsApp Number Found!