गावगाथा

राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, मुरुमची सृष्टी राठोड ठरली ‘रौप्यविजेती’! (प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचा झेंडा राज्यस्तरावर अभिमानाने फडकला!)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका साक्षी देशमाने यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन शिक्षक जगदीश सुरवसे यांनी केले.

राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, मुरुमची सृष्टी राठोड ठरली ‘रौप्यविजेती’!
(प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचा झेंडा राज्यस्तरावर अभिमानाने फडकला!)

(मुरुम प्रतिनाधी)
सातारा जिल्ह्यातील वाई-वठार येथे नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत मुरुम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी सृष्टी सुनील राठोड (इयत्ता ४ थी) हिने उल्लेखनीय कामगिरी करत सिल्वर मेडल (रौप्य पदक) पटकावले आहे.
‘परिश्रमाची पराकाष्ठा आणि आत्मविश्वासाची उंच झेप’ या उक्तीला साजेसं प्रदर्शन करत सृष्टीने आपली चमकदार कामगिरी साकारली असून तिच्या या यशाने मुरुम आणि शाळेचा अभिमान द्विगुणित झाला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त माजी मंत्री बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील, सचिव व्यंकटराव जाधव तसेच सर्व संचालक मंडळांनी सृष्टीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

शाळेतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक सच्चिदानंद अंबर, प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, संगमेश्वर लामजने आणि धनराज हळळे यांनी सृष्टीचा सन्मान करून अभिनंदन केले .
या प्रसंगी शाळेत मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, पर्यवेक्षक वीरेंद्र लोखंडे, सुभाष धुमाळ, पंकज पाताळे, सागर मंडले, जगदीश सुरवसे व प्रशालेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका यांच्या हस्ते सृष्टीचे तीच्या पालका सहीत सत्कार केले .

सृष्टीला या यशामागे प्रशिक्षक रफिक शेख यांचे मार्गदर्शन, तसेच वर्गशिक्षिका सोनाली कारभारी व श्रीदेवी मंडले यांचे सातत्याने प्रोत्साहन लाभले.
सृष्टीची आता राष्ट्रीय (नॅशनल) पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व स्तरावरून तिला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका साक्षी देशमाने यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन शिक्षक जगदीश सुरवसे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button