गावगाथा

केसर जवळगाच्या कन्यांनी राज्यस्तरीय रंगमंचावर उमटवला शौर्याचा ठसा!

दांडपट्टा स्पर्धेत केसर जवळगा शाळेचा यशस्वी झेंडा!

केसर जवळगाच्या कन्यांनी राज्यस्तरीय रंगमंचावर उमटवला शौर्याचा ठसा!

दांडपट्टा स्पर्धेत केसर जवळगा शाळेचा यशस्वी झेंडा!

(मुरुम प्रतिनिधी)

सातारा जिल्ह्यातील वाई-वाठार येथे दिनांक ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या द्वितीय राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचा अभिमान वाढवणारा गौरवशाली क्षण घडला.
पीएमश्री जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा केसर जवळगा येथील दोन प्रतिभावान विद्यार्थिनींनी —कु. दीपिका ख्यामलिंग घोडके व कु. रूपाली शाहुराज गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक मिळवत शाळेचा तसेच तालुक्याचा गौरव वाढवला.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अजीज शेख, माजी सरपंच अमोल पटवारी, माजी अध्यक्ष दत्ता घोडके, तसेच लोकेश पाटील, शुभम कांबळे, शिरीष पाटील आदी मान्यवरांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. याच कार्यक्रमात श्री. हणमंत पाटील (माजी सैनिक तथा नवनियुक्त पोलीस कर्मचारी) यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख मु.अ. बालाजी भोसले, सुनिल राठोड, संजीव भोसले, साधना ताशी, गजानन खमीतकर, अनंत वाघमोडे, सुंकेवर सर, कुन्हाळे सर, तसेच युवा प्रशिक्षणार्थी वैभव पाटील यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी भोसले यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन सुनिल राठोड सर यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेतून विद्यार्थिनींनी दाखवलेला शौर्य, शिस्त आणि चिकाटीचा प्रत्यय पाहून संपूर्ण गावकऱ्यांचा अभिमान वाढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button