गावगाथाठळक बातम्या

Akkalkot political | प्र.क्र. ११ मधून उमेदवार महेश इंगळे यांनी केला प्रचाराचा शुभारंभ…

अक्कलकोट (प्रतिनिधी ): अक्कलकोट नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.११ चे उमेदवार महेश इंगळे यांनी आपल्या प्रभागात प्रचाराची मोहीम सहकाऱ्यांसमवेत व कार्यकर्त्यांसोबत स्वहाती घेऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी, प्रभागातील सह उमेदवार आरती गायकवाड यांचे वडील तथा मा.नगरसेवक उत्तम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाने प्रचाराचा शुभारंभ केला. प्रारंभी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांची आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर टिळक गल्ली, कुंभार गल्ली, बेडर गल्ली इत्यादी आपल्या प्रभागातून त्यांनी या प्रचाराचा शुभारंभ करीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याचे कार्य केले.

या प्रसंगी बोलताना टिळक गल्ली येथील प्रतिष्ठीत व्यापारी तथा नागरीक बबन फडतरे यांनी आमचे श्रध्दास्थान असलेले व्यक्तीमत्व म्हणजे महेश इंगळे. केवळ इलेक्शन व प्रचार काळातच त्यांचा प्रभागातील नागरिकांशी संपर्क येतो असे नाही. ते सातत्याने प्रभागातील व अक्कलकोट शहरातील नागरिकांशी नेहमीच संपर्कात असतात. अनेक नागरिकांच्या अडीअडचणी समस्या आस्थेने जाणून घेतात व नेहमीच मदतीला धावतात, त्यामुळे प्रभागातील नागरिकांसाठी ते नेहमीच लाडके नेते व श्रद्धास्थान राहीले आहेत. त्यांचा शहरातील दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे, त्यामुळे यंदाही सलग पाचव्या टर्म मधून महेश मालक इंगळे हे नक्कीच निवडून येथील व इतिहास रचतील असा विश्वास बबन फडतरे यांनी व्यक्त केला. यावेळी या प्रचार शुभारंभ कार्यात महेश मालक इंगळे यांच्या समवेत प्रथमेश इंगळे, सुरेश कुंभार, धोंडाप्पा कुंभार, बबन फडतरे, बाबा सुरवसे, महेश काटकर, गजू काटकर, चंद्रकांत सोनटक्के, सागर गोंडाळ, भिमा मिनगले, खाजप्पा झंपले, प्रशांत गुरव, गणेश दिवाणजी, सचिन दुर्गे, धर्मा गुंजले, लखन झंपले, गोटू माने, भीमा माने, मनोज इंगोले, रमेश शिंदे, शंकर मिनगले, आप्पाशा मिनगले, रवी मलवे, सुनील नाईकवाडी, दर्शन घाटगे, तुषार मोरे, संतोष अप्पू पराणे, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, शिवशरण अचलेर व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button