Latur : साने गुरुजी विद्यालयात नशा मुक्त भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

लातूर : शहरातील अवंती नगर भागातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी “नशा मुक्त भारत” अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना नशा विरोधी शपथ देण्यात आली. समाज आणि देशाच्या विकासात युवा पिढीचा वाटा महत्त्वाचा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नशा विरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक हिंदी आणि इंग्रजी भाषेत शपथ घेतली. शपथेत नमूद केल्याप्रमाणे स्वतः, मित्र, कुटुंब आणि समाजाला नशे पासून दूर ठेवण्यासाठी कटिबद्ध राहू व बदलाची सुरुवात स्वतःपासून करू, असा दृढ निर्धार विद्यार्थ्यांनी घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये नशा विरोधी जनजागृती, जबाबदारी आणि सकारात्मक सामाजिक मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल शेख, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

