*समाजाच्या दुःखाला वाचा फोडण्याचा युवकांकडून प्रयत्न*
इंद्रायणी साहित्य संमेलनात सचिन बेंडभर पाटील यांचे प्रतिपादन
पुणे दि. 21 (प्रतिनिधी)-
आजचा तरुण हा साहित्य क्षेत्रात दमदारपणे पाऊल टाकत समाजाचे दुःख मांडून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामीण असो वा शहरी आजचा तरुण संवेदनशीलता जपत भरकटलेल्या समाजाला एकसंध करण्याचा प्रयत्न करत आहे. आजची युवा पिढी दमदारपणे व ताकतीने लिहीत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरीत इंद्रायणी साहित्य परिषदेमध्ये आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात मोशी येथे केले.
यावेळी संमेलनाध्यक्षा सिमा काळभोर, प्रमुख पाहुणे व आकाशवाणी पुणे येथील निवृत्त संचालक गोपाल अवटी, स्वागताध्यक्ष निलेश बोराटे, कवी अरूण बोऱ्हाडे, संदीप तापकीर, जेष्ठ साहित्यिक सोपान खुडे, दादाभाऊ गावडे आणि इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. ह भ प श्री. उमेश महाराज बागडे व इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, बाबासाहेब गवारे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन झाले. ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ डॉ. न. म.जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सातारा येथील 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर संपादक डॉ. पौर्णिमा कोल्हे यांच्या अरुण बोऱ्हाडे यांची अक्षरवारी या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्य नगरी मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांना आजची युवा पिढी आणि साहित्य या चर्चासत्रात आमंत्रित केले होते. यावेळी बोलताना बेंडभर म्हणाले, आजचा तरुण हा संघर्षमय आणि तणावपूर्वक जीवन जगत आहे. क्षेत्र कोणतेही असो आजचा तरुण येणाऱ्या कठीण परिस्थितीचा सामना करत स्वतःला घडवत आपले लक्ष गाठण्याचा प्रयत्न करत आहे. साहित्य क्षेत्रातही आजच्या तरुणांनी दमदारपणे पाऊले टाकत यश मिळवले आहे. ग्रामीण असो वा शहरी तरुणांची साहित्यातील योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. आजची युवा पिढी अभ्यासपूर्ण व ताकतीने लिहित आहे असेही ते म्हणाले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ हे होते. या चर्चासत्रात सचिन बेंडभर, तेजस्विनी देशमुख, रसिका सस्ते, शुभम दातखिळे आणि रामेश्वर मोरे यांनी सहभाग घेतला होता. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी डफळ यांनी केली होते.
More Stories
ब्रेकिंग! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी
कृपासिंधू सोशल फाउंडेशन कडून अस्थिव्यंग व मतिमंद निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार शालींचे वाटप……..
बासलेगावमध्ये श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा : ३ ते ५ डिसेंबर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल