अक्कलकोट, सोलापूर |
श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सिद्धक्षेत्र अक्कलकोट या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना आता सज्ज झाली असून, लाडक्या बहिणी-भावांनी साथ दिल्यास अक्कलकोट आणि दुधनी या दोन्ही नगरपरिषदांवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल, असा विश्वास विराट जनसभेत व्यक्त करण्यात आला.
शिवसेनेचे अक्कलकोट नगराध्यक्षपदाचे उमेदवार रईसशेठ टीनवाला आणि दुधनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रथमेश म्हेत्रे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही यावेळी उपस्थित जनसमुदायाला करण्यात आले.
सभेत बोलताना वक्त्यांनी सांगितले की— “मुख्यमंत्री असताना अक्कलकोटच्या ३८२ कोटींच्या सर्वसमावेशक विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. शहरातील नऊ मुख्य रस्त्यांचे काम सुरू आहे. वाहनतळ, वॉटर एटीएम, शौचालये, रस्ते विकास, हत्ती तलाव उद्यान, व्यापारी केंद्र, भक्तनिवास, चौक सुशोभीकरण अशी अनेक कामे मार्गावर आहेत.”
तसेच शहरातील ७२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेलाही मंजुरी देण्यात आल्याचे सांगून गटारव्यवस्था, ड्रेनेज, पथदिवे, स्वच्छता आदींसाठी निधी खर्च केला जात असल्याची माहिती देण्यात आली.
अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावे आणि भक्तांना उत्तम सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. दुधनी शहरातील विकासकामांना देखील पुरेसा निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले.
या सभेला माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, सोलापूरचे संपर्कप्रमुख महेशनाना साठे, शंकर म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि अक्कलकोटकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
ब्रेकिंग! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी
कृपासिंधू सोशल फाउंडेशन कडून अस्थिव्यंग व मतिमंद निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार शालींचे वाटप……..
बासलेगावमध्ये श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा : ३ ते ५ डिसेंबर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल