गावगाथा

बोरोटी कन्नड शाळेचा आगळा-वेगळा उपक्रम..प्लास्टिक वेचणाऱ्या महिलेचा सत्कार करून सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

दिनविशेष

बोरोटी कन्नड शाळेचा आगळा-वेगळा उपक्रम..प्लास्टिक वेचणाऱ्या महिलेचा सत्कार करून सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
अक्कलकोट:-तालुक्यातील बोरोटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सामाजिक जाणीव जपणारा आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील विद्यार्थिनी अनिता हालोळ्ळी होत्या. व्यासपीठावर सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत श्रावणी बिराजदार, संध्या कोळी, प्रेमा जमादार आदी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व विद्यार्थिनी तसेच गावातील लक्ष्मीकांत (पिंटू) पाटील, संतोष कोळी, गंगाधर नागणसुरे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील कचरा व प्लास्टिक गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या अक्कलकोट येथील संगीता मरगाम या महिलेचा शाळेतील विद्यार्थिनी अनिता हालोळ्ळी, श्रावणी बिराजदार, संध्या कोळी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व, कष्टकरी श्रमसंस्कृतीचा आदर आणि सामाजिक भान निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी सावित्रीबाई फुले वेशभूषेत असलेल्या कुमारी प्रेमा जमादार, संध्या कोळी, वर्षा बोरोटीकर, अनिता हालोळ्ळी, श्रावणी बिराजदार, ग्वालव्वा पुजारी, सौजन्य पुजारी, शरणव्वा पुजारी, सुष्मिता पुजारी,अमरीन, श्रद्धा पाटील आदी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची व लिंबू-चमचा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री तांबे, उपशिक्षक शरणप्पा फुलारी, अनंत बांगर, अंजली वाघमारे, नसरीन पठाण तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरणप्पा फुलारी यांनी केले तर आभारप्रदर्शन राजश्री तांबे यांनी केले.
हा उपक्रम केवळ जयंती साजरी करणारा न राहता समाजप्रबोधन, स्वच्छता आणि श्रमाच्या सन्मानाचा संदेश देणारा ठरला.
फोटो ओळ :- सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बोरोटी कन्नड शाळेत परिसरातील कचरा,प्लास्टिक गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या अक्कलकोट येथील संगीता मरगाम या महिलेच्या सत्कार करून आगळा वेगळा पद्धतीने साजरा करण्यात आले.या वेळी पिंटू पाटील,संतोष कोळी,गंगाधर नागणसुरे,शाळेचे मुख्याध्यापिका राजश्री तांबे, शरणप्पा फुलारी, अंजली वाघमारे,नसरीन पठाण,अनिता हालोळ्ळी, श्रावणी बिराजदार,संध्या कोळी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button