गावगाथा

ठळक बातम्या

कृपासिंधू सोशल फाउंडेशन कडून अस्थिव्यंग व मतिमंद निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार शालींचे वाटप……..

कृपासिंधू सोशल फाउंडेशन कडून अस्थिव्यंग व मतिमंद निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार शालींचे वाटप……..

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती सोलापूर संचलित अस्थिव्यंग व मतिमंद विद्यार्थ्यांच्या अक्कलकोट येथील निवासी शाळेतील ३० विद्यार्थ्यांना शहरात नव्याने स्थापन झालेल्या कृपासिंधू सोशल फाउंडेशन च्या वतीने उबदार शालींचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कोंडीबा इंगळे प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योगपती चंद्रकांत इंगळे, उद्योगपती ओंकार कोरे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला .
याप्रसंगी फाउंडेशनचे सचिव रवीकिरण पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामधून कृपासिंधू सोशल फाउंडेशन स्थापन करण्याचे उद्दिष्ट विशद केले.

याप्रसंगी उधोगपती चंद्रकांत इंगळे यांनी कृपासिंधू फाउंडेशन मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यात फाउंडेशनला मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. कृपासिंधू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एस टी पाटील यांनी फाउंडेशनने करीत असलेल्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना व समाजातील उपेक्षित घटकांना विविध रूपात मदत करून त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा कृपासिंधू फाउंडेशन चा प्रयत्न राहील असे आश्वासित केले. कडक थंडीच्या दिवसात कृपासिंधू फाउंडेशनने गरम शालीची मदत केल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे फुलल्याचे पाहून शिक्षकांनी फाउंडेशनचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार अरविंद पाटील यांनी केले सदरच्या प्रसंगी युवा उद्योजक ओंकार कोरे, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते, संतोष नरुणे, ओम हत्ते, आणि निवासी शाळेतील शिरीष बन्ने, विठ्ठल मदरी, इराया स्वामी शीला पवार आदी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.